शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त रुग्णसंख्या दीडपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 01:06 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.२९) एकूण ३९७८ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ६२०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३८ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४५७ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे भय संपत नाही : बळींच्या संख्येने ओलांडला तेहतीसशेचा आकडा

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.२९) एकूण ३९७८ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ६२०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३८ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४५७ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २०७९, तर नाशिक ग्रामीणला १७९६ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ३७ व जिल्हाबाह्य ६६ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २५ , मालेगाव मनपा ४ असा एकूण ३८ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. तरीदेखील नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे चित्र जाणवत आहे.उपचारार्थी ४२ हजारांवरजिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४२३१३ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यात २३ हजार ४४४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १६ हजार ८५९ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ७०८ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३०२ रुग्णांचा समावेश आहे.प्रलंबित अहवालात पुन्हा वाढगत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या मोठी राहत होती. मात्र, गत रविवारपासून प्रलंबित अहवालांची संख्या पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी होऊ लागली होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा प्रलंबित अहवाल वाढू लागले आहेत. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ५७१८ असून नाशिक मनपा क्षेत्रातील २७४२, तर मालेगाव मनपाचे ४१५ अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल