शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

सीटीलिंकच्या निम्म्या बस आता तपोवनऐवजी निमाणीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 01:07 IST

तपोवन स्थानकातून बस आणताना निमाणीपर्यंत महापालिकेच्या सीटीलिंक बसला प्रतिसाद मिळत नाही, त्याची दखल घेेऊन महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या साहाय्याने आता निमाणी स्थानकातून बस सोडण्याचा निर्णय घेतला. तो पथ्यावर पडला असून, एका दिवसात पंचवीस हजार रुपयांनी उत्पन्न वाढले म्हणजे तोटा कमी झाला आहे.

ठळक मुद्देबचतीचा मार्ग : एकाच दिवसात पंचवीस हजारांची पडली भर

नाशिक : तपोवन स्थानकातून बस आणताना निमाणीपर्यंत महापालिकेच्या सीटीलिंक बसला प्रतिसाद मिळत नाही, त्याची दखल घेेऊन महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या साहाय्याने आता निमाणी स्थानकातून बस सोडण्याचा निर्णय घेतला. तो पथ्यावर पडला असून, एका दिवसात पंचवीस हजार रुपयांनी उत्पन्न वाढले म्हणजे तोटा कमी झाला आहे.

नाशिक शहर बस वाहतूक ही तोट्यातच चालणार हे गृहीत धरण्यात आले असले तरी तो कमी व्हावा यासाठी पर्यायी उत्पन्नाची साधने शोधली जात आहेत. त्यातच मुख्य धावणाऱ्या बसला ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे, त्या मार्गालाच प्राधान्य दिले जात आहे. सध्या कोरोनामुळे असलेले निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असला तरी अद्याप तो अपेक्षेनुसार नाही. महापालिकेचे पंचवटीत तपोवन आणि नाशिकरोड असे दोन डेपो असून, त्यातील तपोवन डेपोतून निघालेल्या बसला काही अंतरापर्यंत प्रतिसाद मिळत नाही. दररोज सरसरी एकच प्रवासी इतका भार आहे.

महापालिकेला प्रतिकिलो मीटर ठेकेदारला खर्च द्यावा लागतो. मात्र उत्पन्न मिळत नसल्याने तपोवनऐवजी निम्म्या बस निमाणी थांब्यावरून सोडण्याचे ठरविण्यात आल्यामुळे तपोवनात जाणे आणि तेथून परत रिकामे येण्यामुळे होणारा तोटा कमी झाला असून, उलट निमाणीमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासीदेखील उपलब्ध होत आहेत.

सध्या सीटीलिंकच्या ५२ बस शहरात धावत आहेत. सध्याच्या प्रतिदिन उत्पन्नात तपोवन आगाराचे एक लाख ६९ हजार ३७० रुपये उत्पन्न असून, नाशिकरोड आगाराचे एक लाख ४७ हजार ६८० रुपये उत्पन्न मिळत आहे. साेमवारपासून निम्म्या बस निमाणीत थांबू लागल्याने महापालिकेचा तोटा कमी होऊन उत्पन्नात भर पडली.

इन्फो...

प्रतिदिन पंधरा हजारांचा टप्पा

नाशिक महापालिकेच्या बससेवेला रविवारी (दि.८) एक महिना पूर्ण होत असताना प्रवासीसंख्येने प्रतिदिन १५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोमवारी (दि.९) आजवरची सर्वाधिक १५ हजार ५३१ प्रवासीसंख्या गाठली गेली. तसेच साेमवारी तीन लाख २० हजार १२५ रुपयांचे आजवरचे सर्वाधिक उत्पन्नही मिळाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbusinessव्यवसाय