शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

बिनविरोध निवडणुकीचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:48 IST

नांदगाव : सत्तेच्या सारिपाटात मोठी पदे मिळविण्यासाठी तत्त्वांचा बाजार मांडणाऱ्या गावगुंडीच्या राजकारणात अन् कुरघोडीचा डाव खेळण्याच्या भाऊगर्दीत नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गावाचा गेल्या दहा पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकांचा कित्ता सर्वांनी गिरवावा असाच आहे. गेल्या ५० वर्षांत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचा आदर्श निर्माण करणाºया बाणगाव बुदु्रकची निवडणूक याहीवेळी बिनविरोध झाली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार रिंगणात उरले. सर्व गावाला एका सूत्रात ओवण्याचे श्रेय बापूसाहेब कवडे या एका व्यक्तीकडे जाते.

ठळक मुद्देबाणगाव ग्रामपंचायतीचा आदर्श : कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : सत्तेच्या सारिपाटात मोठी पदे मिळविण्यासाठी तत्त्वांचा बाजार मांडणाऱ्या गावगुंडीच्या राजकारणात अन् कुरघोडीचा डाव खेळण्याच्या भाऊगर्दीत नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुक गावाचा गेल्या दहा पंचवार्षिक बिनविरोध निवडणुकांचा कित्ता सर्वांनी गिरवावा असाच आहे.गेल्या ५० वर्षांत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीचा आदर्श निर्माण करणाºया बाणगाव बुदु्रकची निवडणूक याहीवेळी बिनविरोध झाली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार रिंगणात उरले. सर्व गावाला एका सूत्रात ओवण्याचे श्रेय बापूसाहेब कवडे या एका व्यक्तीकडे जाते.यावेळी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी संगीताबाई गोविंद बागुल या महिलेची जनतेमधून बिनविरोध निवड झाली. तर तीन प्रभागातील नऊ जागांवर अनुक्र मे शांताराम कवडे, नारायण कवडे, पल्लवी घोडके, रावसाहेब बागुल, अलका कवडे, संगीता देवकर, सुनील कवडे, जनाबाई कवडे हे उमेदवार रिंगणात आहेत. १९६६ मध्ये बाणगाव बुद्रुक व खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध झाली. मात्र १९७० च्या निवडणुकीत वाद निर्माण होऊन मोठ्या स्वरूपात भांडणे झाली. त्यावेळी गावाची समजूत घालून त्यांना एकत्र करण्यासाठी बापूसाहेब कवडे यांनी मोठी भूमिका बजावली. यापुढे निवडणूक बिनविरोधच करायची, असा गावाने निर्णय घेतला, तो आजतागायत पाळला. विशेष म्हणजे कवडे यांच्या घरातील एकही व्यक्ती आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य झालेली नाही.गाव करील ते राव काय करील !गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती बाणगाव बुने खरी ठरविताना बाणगावचा बाणा एकोप्याचाच आहे हे गावाने दाखवून दिले. गावाला सूत्रात ओवणारे कवडे हे शिवसेनेचे आहेत. आजच्या स्थितीवर गावचे भाजपचे नेते सजन कवडे यांची प्रतिक्रि या बोलकी आहे. ते म्हणाले की, ‘एकोपा असल्याने अनेक दिवस आमच्या घरात सत्ता होती. यावेळी आमच्या घरात सत्ता नको. दुसºया कोणाला तरी पद द्या, असे सांगितले.

टॅग्स :nandgaon-acनांदगावElectionनिवडणूक