शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

विद्युत तारा पडल्याने दीड एकर ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:42 IST

जीर्ण झालेल्या विद्युत तारा एकमेकांना घासून विजेच्या पडणाºया ठिणगीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील तळवाडे येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडला. या घटनेत दीड एकर ऊस खाक झाला आहे.

सायखेडा : जीर्ण झालेल्या विद्युत तारा एकमेकांना घासून विजेच्या पडणाºया ठिणगीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील तळवाडे येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडला. या घटनेत दीड एकर ऊस खाक झाला आहे.उसाच्या शेतावरून विद्युत तारा गेल्या असून, या तारा जुन्या झाल्याने त्यांची क्षमता संपल्याने तारा तुटल्याच्या घटना वारंवार घडतात. येथील पोपट सावळीराव सांगळे यांचे गट क्रमांक १०६ तर त्यांच्याच शेजारी असलेल्या सुखदेव फिकरा सांगळे यांच्या शेतातील गट १०७ मधील उसावर तारा पडल्याने दीड एकर क्षेत्र होरपळले आहे. सांगळे यांची तळवाडे गावालगत ऊस असुन ऊस क्षेत्रात वरून जाणाºया विद्युत तारा लोंबकळत असल्याने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेत शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गोदाकाठ भागातील या महिन्यातील ही चौथी घटना आहे. वारंवार होणाºया शॉर्टसर्किटमुळे शेतकरी त्रस्त झाला असून, भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकºयांनी केली आहे.