शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कामगार संघटना निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

ओझर टाऊनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी पूर्ण झाल्याने संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ...

ओझर टाऊनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी पूर्ण झाल्याने संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सत्ताधारी व विरोधी गटांतर्फे मोर्चेबांधणी करण्यात येत असून, गुप्त बैठकांच्या माध्यमातून उमेदवार चाचपणीचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्यामुळे प्रत्येक गटप्रमुखास उमेदवार निवडीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सत्ता पुन्हा आपल्याच गटाच्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी गट तसेच मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विरोधी गटातर्फे जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधी गटातर्फे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीसपद हे महत्त्वपूर्ण व अधिकाराचे पद असल्यामुळे हे पद ज्या गटाकडे जाते त्या गटाची सत्ता असते. सरचिटणीस पदासाठी सत्ताधारी गटाकडून कै. रामू जाधव गटाचे सचिन ढोमसे, माजी सरचिटणीस कै. प्रशांत भोजने गटाचे माजी सरचिटणीस संजय कुटे, जागृती विचार मंच गटाचे व माजी प्रभारी सरचिटणीस अनिल मंडलिक यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांकडून कारखान्याबाहेर कामगारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या जात आहेत.

गेल्या निवडणुकीत तीन वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविलेले हे तीन गट पुन्हा वेगवेगळे पॅनल उभारणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही गटाचे नेते कामगार मित्रमंडळ, विविध जिल्हा व तालुका, विविध समाज, मित्रमंडळासह इतर संघटना यांच्याशी संपर्क साधत असून, त्या माध्यमातून आपापल्या पॅनलसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी चाचपणी केली जात आहे.

इन्फो...

एचएएल कामगार संघटना पदाधिकाऱ्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ दि. १५ जून रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कामगार संघटनेची निवडणूक वेळेवर होणे कामगारांना अपेक्षित आहे. संघटनेने व्यवस्थापनाशी त्वरित पत्रव्यवहार करून कामगार संघटनेने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी कामगारांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांच्याकडे केली आहे. वेळेत व गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, अशी कामगारांची व गटनेत्यांची मागणी आहे.