शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल संपप्रश्नी आमदारद्वयींची संरक्षण मंत्रालयात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:21 IST

कामगारांना अधिका-यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळावेत, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएलमधील कामगारांचा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारल्याने एचएएलचे कामकाज ठप्प झाले असून, फक्त अधिकारी वर्ग कामावर आहे.

ठळक मुद्देकामगारांना बारा ते तेरा टक्के वेतनवाढ तर बावीस ते तेवीस टक्के इतर भत्ते दिले जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कामगारांना अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनवाढ आणि भत्ते मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स प्रा. लि. कर्मचाऱ्यांचा गेल्या बारा दिवसांपासून देशव्यापी संप सुरू असून, या संपावर तोडगा काढावा यासाठी खासदार भारती पवार व हेमंत गोडसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील प्रॉडक्शन सेक्रेटरी सुभाषचंद्र यांची भेट घेऊन निवेदन दिले. दिवाळीपूर्वी या संपावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

कामगारांना अधिका-यांप्रमाणेच वेतनवाढ आणि इतर भत्ते मिळावेत, या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून एचएएलमधील कामगारांचा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारल्याने एचएएलचे कामकाज ठप्प झाले असून, फक्त अधिकारी वर्ग कामावर आहे. संपकरी कामगारांनी यासंदर्भात शासन दरबारी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला असूनही अद्याप शासनाकडून संपाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या गोष्टीची दखल घेत, खासदार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील प्रॉडक्शन सेक्रेटरी सुभाषचंद्र यांची भेट घेतली. कामगारांच्या संपाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाल्याने कामगारांच्या मागण्यांविषयी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. कामगारांच्या मागण्या न्यायिक असूून, दिवाळीपूर्वीच यावर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन यावेळी सुभाषचंद्र यांनी दिले. या चर्चेतून अधिकाºयांच्या तुलनेत कामगारांना बारा ते तेरा टक्के वेतनवाढ तर बावीस ते तेवीस टक्के इतर भत्ते दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. याबरोबरच ओझर एचएएलमधील वर्कलोड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, आउटसोर्सिंगचे कामही एचएएलला मिळण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक सुखोईच्या बांधणीचे काम एचएएलला मिळण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक