ओझर टाउनशिप : येथील एचएल कामगार संघटनेच्या ३१ जागांसाठी १५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपला पॅनल, जागृती पॅनल व श्री समर्थ शक्ती पॅनलमध्ये तिरंगी लढत होत असली तरी काही पदांसाठी जनशक्ती पॅनलचे उमेदवारसुद्धा लढत देणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर शुक्रवारी निवडणूक अधिकाºयांनी जाहीर केलेल्या अंतिम यादीनंतर पॅनलच्या नेत्यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. १३ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. दरम्यान, दि.९ जूनपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.
एचएएल : पॅनलचे उमेदवार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:24 IST