शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

एचएएल कारखाना दोन शिफ्टमध्ये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:42 IST

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कारखान्यातील काम पूर्वपदावर सुरू झाले असून, कंटेन्मेंट झोन वगळून इतरत्र राहणारे कामगार व अधिकारी यांना कारखान्यात कामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने कामगार, अधिकारी व कंत्राटी कामगार सर्व नियमांचे पालन करीत रोज कामावर उपस्थित राहत असून, दोन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करीत आहेत. प्रत्येक शिफ्ट ८ तासांची आहे.

ठळक मुद्देओझर टाउनशिप : काम पूर्वपदावर; आजपासून ८ तासांची शिफ्ट

लोकमत न्यूज नेटवर्कओझर टाउनशिप : येथील एचएएल कारखान्यातील काम पूर्वपदावर सुरू झाले असून, कंटेन्मेंट झोन वगळून इतरत्र राहणारे कामगार व अधिकारी यांना कारखान्यात कामावर येण्यास व्यवस्थापनाने परवानगी दिली असल्याने कामगार, अधिकारी व कंत्राटी कामगार सर्व नियमांचे पालन करीत रोज कामावर उपस्थित राहत असून, दोन वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करीत आहेत. प्रत्येक शिफ्ट ८ तासांची आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या पार्श्वभूमीवर एचएएल व्यवस्थापनाने केंद्र शासनाच्या आदेशानुसार २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनमुळे कारखान्यातील काम बंद ठेवून कामगार व अधिकारी यांना सुट्टी दिली होती. त्यानंतर १५ एप्रिल ते ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढविला. दरम्यान, २० एप्रिलपासून परिस्थिती बघून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यामुळे कारखाना सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला, त्यानुसार एचएएल कारखाना सोमवारपासून (दि. २० एप्रिल) सुरू झाल्यानंतर दक्षता म्हणून फक्त ओझर टाउनशिपमध्ये राहणारे एचएएल कामगार व अधिकारी (एकूण १४५४) यांनाच कामावर येण्याची परवानगी व्यवस्थापनाने दिली होती.एचएएल कामगार पिंपळगाव, चांदवड, जानोरी, मोहाडी, नाशिक, सिन्नर आदी ठिकाणी राहावयास आहे यापैकी काही ठिकाणी रेडझोन असल्यामुळे त्यांना कामावर रुजू होण्यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे कारखान्यात एकूण १२५० ते १३०० कामगार व अधिकारी उपस्थित राहत होते. काही दिवसांनंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या कामगारांना कामावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. कामगारांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, कामगार एकमेकांत ठरावीक अंतर ठेवून काम करू शकतील या दृष्टिकोनातून एचएएल कारखान्यात दोन शिफ्ट करण्यात आल्या. एक शिफ्ट ५ तासांची करण्यात आली होती. फर्स्ट शिफ्ट सकाळी ७ ते १२, व सेकंड शिफ्ट दुपारी १ ते सायंकाळी ६ त्यानंतर बदल होऊन शनिवारपर्यंत ७ तासांची शिफ्ट करण्यात आली होती आणि सोमवारपासून आठ तासांची शिफ्ट करण्यात आली असून, फर्स्ट शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ व सेकंड शिफ्ट दुपारी सव्वातीन ते रात्री ११.१५ पर्यंत असणार आहे. कामगार व अधिकारी त्यांना विभागून दिलेल्या शिफ्टमध्ये काम करणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOzarओझर