शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

हज-उमराह यात्रा : ९७ इच्छुकांना दोन कोटींना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:07 IST

जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती.

ठळक मुद्देहा कोट्यवधींचा घोटाळाफसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक

नाशिक : इस्लाम धर्मात पवित्र व अनिवार्य मानली जाणारी हज-उमराह यात्रा दरवर्षी हजारो समाज बांधवांकडून केली जाते. सौदी अरेबियामधील ही यात्रा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विविध शहरांमधील शेकडो यात्रेकरूंनी जहान इंटरनॅशनल टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलर्समार्फत बुकिं ग केली आहे. फिर्यादीसह अन्य ९७ यात्रेकरूंची सुमारे २ कोटी २४ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक या ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी केल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शकील गणी सय्यद (५२, रा. आडगाव) यांनी वडाळारोडवरील जहान टूर्समार्फत हज-उमराह यात्रेला जाण्यासाठी कुटुंबातील पाच सदस्यांचे एकूण साडेसात लाख रुपये भरले होते. २०१८ साली सुमारे शेकडो नागरिकांनी नोंदणी केली होती. यामध्ये संपूर्ण राज्यातील लोकांचा समावेश आहे. टूर्सचे संचालक संशयित अब्दुल मतीन मनियार, समीर शमशुद्दीन मनियार, अजीज बनेमियॉँ मनियार, शाहरूख जुनेद मनियार, अमजद करीम मनियार, शकील बनेमियॉँ मनियार, मुस्तकीम गणी मनियार, अझहर अयाज मनियार, सोहील शेख यांनी आपापसांत संगनमताने कट कारस्थान रचून हज-उमराहच्या धार्मिक यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचे फिर्यादी शकील गणीभाई सय्यद यांनी तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्यातील ९७ नागरिकांनी पोलिसांकडे या घोटाळ्यात फसवणूक झाल्याप्रकरणी धाव घेतली आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत शहरात झालेला हा कोट्यवधींचा घोटाळा असून तक्रारदारांसह फसवणुकीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सप्टेंबर महिन्यात पावणे दोन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात या संशयितांविरुद्ध दाखल झाला होता. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील नंदवाळकर करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयHaj yatraहज यात्राfraudधोकेबाजी