शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेला बेवारस घोड्यांच्या कळपाने ग्रामस्थ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:10 IST

भीतीचे वातावरण : चा-याअभावी पशुधन वा-यावर

ठळक मुद्देमागील वर्षी सर्वत्र पाऊस कमी झाल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे.

उमराणे : जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांना पशुधन सांभाळणे कठिण बनले असून चा-याअभावी जनावरांना मोकाट सोडून दिले जात आहे. उमराणे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाच ते सहा बेवारस घोड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून त्यांना आवरणे ग्रामस्थांना कठीण होऊन बसले आहे.येथील गावठाण परिसरातील शेतवस्त्यांवर गेल्या आठ दिवसांपासून पाच ते सहा बेवारस घोड्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यांना हुसकावून लावताना हा कळप प्रतीहल्ला करण्याच्या तयारीत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी सर्वत्र पाऊस कमी झाल्याने चारा व पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतक-यांना चारा व पाण्याअभावी पाळीव पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून येथील शेतवस्त्यांवर बेवारस घोड्यांचा कळप फिरत असून शेतक-यांनी पाळीव जनावरांसाठी साठवणुक केलेल्या चा-यावर डल्ला मारला जात आहे. या घोड्यांना हुसकावून लावताना हा कळप प्रतीहल्ला करण्याच्या भीतीने शेतवस्त्यांवरील नागरिक हैराण झाले आहेत.

चारा छावण्या उभारण्याची मागणी

चालुवर्षी कमी पावसाअभावी खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतक-यांजवळ गुरांसाठी चारा व पाणी शिल्लक नाही. त्यामळे महागडे जनावरे बेवारस सोडुन देण्याची वेळ आली आहे. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक