शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गारठा : किमान तपमानाचा पारा १०.४ अंशांवर राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 01:17 IST

शहराच्या किमान तपमानात घट झाल्यामुळे रविवारी पारा थेट १०.४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे राज्यात सर्वांत कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.

ठळक मुद्देया आठवड्यात थंडीचा जोर वाढला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठलेथंडीचा कडाका वाढणार

नाशिक : शहराच्या किमान तपमानात घट झाल्यामुळे रविवारी पारा थेट १०.४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे राज्यात सर्वांत कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून, नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तपमान १२ अंशांच्या जवळपास होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.४ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहेत. हंगामातील हे सर्वांत निचांकी किमान तपमान नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेपासून ज्यांची दिनचर्या सुरू होते अशा घटकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागला. दूधविके्रते, पेपरविक्रेते, विविध गुणकार रसविक्रेत्यांसह सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते. मागील वर्षी थंडीचा कडाका १२ नोव्हेंबरला कमालीचा वाढलेला होता. त्यावेळी शहराचे किमान तपमान ९.६ इतके नोंदविले गेले होते. सूर्यास्तानंतर थंडीची तीव्रता वाढली असून, गोदाकाठावर शेकोट्या पेटवून मजुरी करणाºया कुटुंबीयांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी दुचाकीस्वार गरम कपडे घालून बाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. थंडीमुळे शहरातील खाऊगल्ल्याही रात्री लवकरच सुन्या झाल्या होत्या. रविवार मात्र सुटी असल्यामुळे खवय्यांची खाऊगल्ली भागात गर्दी दिसून येत होती; मात्र थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी तातडीने खरेदी व चंगळ आटोपती घेत घराकडे प्रस्थान केल्याचे दिसून आले. यामुळे रविवार असूनही रात्री साडेआठ वाजेपर्यंत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकू णच चालू आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.