शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गारपीट : अनेक तालुक्यात जनावरे, शेळ्या, कोंबड्या दगावल्या; काही ठिकाणी बोगस पंचनामे

By admin | Updated: March 16, 2015 00:41 IST

आभाळच फाटले ठिगळ लावणार कसे?

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने झालेले नुकसान हे लाखो रुपयांचे असून, शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. जणूकाही आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार असा प्रश्न आहे. चांदवड : तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीने लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शासकीय पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक पंचनामे करीत असून, या गारपिटीने तालुक्यातील जोपूळ येथील पोपट रेवजी वाघ यांच्या शेतात वीज पडून एक बैल ठार झाला, तर वडबारे येथील शंकर भिका जाधव यांच्या शेतात गारपिटीमुळे गुदमरून दोन शेळ्या, जोपूळ येथे २ शेळ्या, नांदूरटेक येथील रामनाथ देवराम शिंदे यांच्या दोन गायी गुदमरून मृत झाल्यात, तर मंगरूळ येथील बबन दामू जाधव यांच्या ४०० कोबंड्या, गणूर येथील सयाजी जाधव यांच्या ४५० कोंबड्या, हिरापूर येथील २०० कोंबड्या गारपीटीमुळे मृत पावल्या तर गुऱ्हाळे येथील विठ्ठल महादेव भवर यांच्या ३०० कोंबड्या मृत पावल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख , कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली. चांदवड तालुक्यात शुक्रवार दि. १३ रोजी शिवरे , बोराळे व परिसरात अवकाळी पावसानेमुळे शेती व फळपिकांचे नुकसान झाले. यावेळी एकूण १३ गावात गारपिट झाली त्यात गावनिहाय झालेला पाऊस चांदवड २.८ मिमी , दिघवद १ मिमी, रायपूर ३ मिमी, वडनेरभैरव १,७० मिमी, दुगाव २५मिमी, वडाळीभोई२.०५ मिमी तर चांदवडला सरासरी ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर द्राक्ष पिकाचे ७४० शेतकऱ्यांचे ३६० हेक्टर क्षेत्र, कांदा पिकाचे ३१० शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्र, हरभरा पिकाचे १८० शेतकऱ्यांचे ९० हेक्टर क्षेत्र, गहु पिकाचे ४५५ शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १६८५ शेतकऱ्यांचे ८६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल अहेर, यांच्या समवेत प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी शिवरे, बोराळे, बहादुरी, जांबुटके व परिसरात केली . शनिवार दि. १४ मार्च रोजी चांदवड व परिसरात ३८ गावात गारपीट व अवकाळी पावसामुळे घरे , जनावरे, शेती, फळपीकांची नुकसान झाले. तालुक्यातील मंडल निहाय झालेला पाऊस चांदवड १८.२ मिमी, दिघवद २ मिमी, रायपूर ९ मिमी, वडनेरभैरव ० मिमी, दुगाव १५ मिमी, वडाळीभोई २.८० मिमी तर चांदवडला सरासरी ७.८३ मिमी पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात पडलेल्या गारपीटीमुळे एकूण १२ गावात ६२६ अंशत: नुकसान झाले ओ. तर द्राक्ष ६२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, कांदा ३७२५ शेतकऱ्यांचे १५४४ हेक्टर, हरभरा १६५९ शेतकऱ्यांचे ५४६.५ , गहु २०२३ शेतकऱ्याचे ७६९ हेक्टर, कांदा डोंगळे ६२३० शेतकऱ्यांचे ४६७.५० हेक्टर, डाळींब ३२३ शेतकऱ्यांचे ६२७ हेक्टर, भाजीपाला ७८८ शेतकऱ्यांचे ३८१.५० हेक्टर , इतर ७ शेतकऱ्यांचे ७.६० हेक्टर असे एकूण १५३८२ शेतकऱ्यांचे ४६९३.१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी वडबारे येथे रात्री उशीरा भेट देऊन मृत्यू पावलेल्या शेळ्या गायी, जनावरांची पाहणी केली. व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे. जोरण येथे केले बोगस पंचनामेजोरण- बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात बोगस पंचनामे केले. शासनने निधि दिला पण वेविस्थत खातेदारांना वाटप केले नाही जोरण तलाठी कार्यालयात एकूण 155 खातेदारांना लाभ मिळालेला नाही तर तलाठी व कोतवाल यांनी एकञीत येवून जोरण ,निकवेल , विंचुरे , कपालेश्वर, देवपूर, आदी गावांचा समावेश आहे बोगस पंचनामे करु न शासनाकडे पाठवले पंचनामानुसार खातेदारांची वर्गवारी केली.ऐन दुष्काळाच्या काळात शेतकर्याला मदत निधी दिला पण त्याच्यात बळिराजाचा खर्च सुध्दा निघाला नाही असा बोगस कारभारामुळे जोरण परिसरातील शेतकर्यांनी संताप वेक्त केला आहे अशा या बोगस कारभारामुळे १५५ खातेदार दुखावले या खाते दारांनी त्ांलाठी व कोतवाल यांना सांगितले तर त्याच्या कडून उत्तर असे मिळाले की, आम्ही रजेवर आहेत तर वंचित बळीराजा जानार कुठे पंचनामाच्यावेळी खातेदाराची किंमत केली नाही अशा ह्या बोगस कारभाराला कोतवाल व तलाठी जबाबदार आहे. लासलगाव : वनसगाव सारोळे खुर्द शिवडी, ब्राम्हणगाव वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड प्र२माणात गारपीटीने गारांचा थर साचुन हिरव्या गार शेतीऐवजी बर्फाच्छदीत शेती दिसत होती. लासलगाव तसेच निमगाव वाकडा येथेही सुमारे अर्धा तास गारपीटीने झोडपले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झाले नाही इतके प्रचंड नुकसान झाले आहेउगावला गारपीटी सह वादळी अवकाळी पावसाने सुपारीच्या आकाराएवढ्या गारपीटीने व वादळी वारे पावसामुळे सर्व हजारो एकर द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले थर द्राक्ष बागांच्या पाणांची जोरदार पाणगळ झाली आहे.(लोकमत चमू)