शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भगूर, कॅम्प भागातूून दारणात गटारीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:27 IST

भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

भगूर : भगूर नगरपालिका व देवळाली कॅम्प छावणी परिषदेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी दारणा नदीपात्रात मिसळले जात असल्याने नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.भगूरमधील नरशा ओहळ, राम मंदिररोड, राजवाडा, देवळाली कॅम्प छावणी परिषद हद्दीतील सैनिक सोसायटी, अमित श्रीमंत रो-हाउस, शहा सोसायटी, पंचदीप सोसायटी, एमईएस सोसायटी, विजयनगर, दोनवाडेरोड आदी ठिकाणच्या नाले, गटारी यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी दारणा नदीपात्रात जाऊन मिसळत आहे. याकडे भगूर नगरपालिका व छावणी परिषदेकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नदीपात्रातील मासे व इतर जलचर प्राण्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रातून जलशुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी हे योग्य पद्धतीने शुद्धीकरण केले जात नसल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. यामुळे संसर्गजन्य रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. दारणा नदीपात्रात भगूर व देवळाली कॅम्प भागातून मोठ्या प्रमाणात गटारी, नाल्याचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. याकडे प्रदूषण नियामक मंडळाने गांभीर्याने लक्ष देऊन नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी कठोर कारवाई करून उपाययोजनेच्या सूचना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.