शहरं
Join us  
Trending Stories
1
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
2
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
3
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
4
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
5
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
6
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
7
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
8
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
9
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
10
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
11
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
12
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
13
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
14
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
15
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
16
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
17
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
18
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
19
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
20
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी

राजस्थानमधून सापुतारा मार्गे थेट नाशकात दोन कंटेनर भरून आणला गुटखा; पोलिसांनी उधळला कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 19:03 IST

या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला

नाशिक : राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतुक यावर प्रतिबंध असतानासुध्दा राज्यात विक्रीिसाठी चोरट्या मार्गे राजस्थानच्या दोन कंटेनर भरुन मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. वणीजवळील करंजखेड फाट्यावर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हे कंटेनर रोखले. सुमारे १ कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा या कंटेनरमधुन जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखुचा मोठा साठा नाशिक-सापुतारा मार्गावरुन वणी येथून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. या माहितीच्याअधारे त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत सचिन पाटील यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. करंजखेडजवळील फाट्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१६) रात्री सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनर (आर.जे. जीए३९१४) आणि दुसरा कंटेनर (आर.जे.३० जीए ३८२४) एकापाठोपाठ आले असता पोलिसांनी शिताफीने ते रोखले. या दोन्ही कंटेनरची पथकातील पोलीसांनी झडती घेतली असता यामध्ये मिराज कंपनीचा राज्यात विक्री, वाहतुक आणि साठवणुकीवर बंदी असलेला गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.

यामुळे पोलिसांनी तत्काळ या दोन्ही कंटेनरचे चालक, वाहक संशयित महेंद्रसिंग, शंबुसिंहानी सोलंकी (३८,रा. उदयपुर), शामसिंग चतुरसिंह राव (४४), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (५६,दोघे, रा. बिदसर, चितोडगड), लोगल मेहवाल (४८,रा. उदयपुर) यांना गुटख्याची नाशिकमार्गे राज्यात विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करताना आढळून आल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेले दोन्ही मोठे कंटेनर जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे १ कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPolice Stationपोलीस ठाणेArrestअटक