शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजनांचे संस्कार कायमस्वरूपी टिकतात :  वेदश्री थिगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:55 IST

माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.

नाशिक : माता-पित्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या गुरुजनांनी केलेले संस्कार हेच कायमस्वरूपी टिकतात आणि त्यातून सुदृढ भावी पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.सोमवारी (दि.०९) मखमलाबाद सार्वजनिक वाचनालयाच्या ४५वा शिक्षक गौरव समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे होते. व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष तिडके, सत्कारार्थी शिक्षक ज्योती काळोगे, कल्पना पाटील, जनार्दन गायकवाड, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कारभारी गावले, वाचनालयाचे संचालक देवराम पवार, बाळासाहेब ताजणे आदी उपस्थित होते. यावेळी मविप्र संचालक सचिन पिंगळे, नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विलास आव्हाड, बंडूनाना दराडे, मुख्याध्यापक नीलम घुले, निवृत्ती महाले, देवराम पवार, सुभाष काकड, राका माळी, संजय गामणे, संजय काकड, तुकाराम तांबे, शंकर पिंगळे, गोविंद तिडके, डी. सी. माळी आदी उपस्थित होते. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले प्रास्ताविक गोकुळ काकड यांनी, तर आभार संजय फडोळ यांनी मानले.श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षिका ज्योती काळोगे, कै. नारायणराव मानकर प्रायमरी स्कूलच्या उपशिक्षिका कल्पना पाटील, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जनार्दन गायकवाड यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ग्रंथभेट स्वरूपात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.भारतीय पत्रकार संघाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शोभा आरोटे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक