चांदवड : तालुक्यात विविध संस्था संघटनांच्यावतीने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामविकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय दरसवाडी येथे गुरुपौणिमा साजरी झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. पी. बोरसे हे होते. सूत्रसंचालन कु. ऋतुजा चव्हाण व किशोर कहाडणे यांनी केले. विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. बोरसे यांनी गुरुंचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमास व्ही. आर. कर्डक, बी. डी. शिंदे, श्रीमती आर. एस. चव्हाण, बी. एन. चव्हाण, के. पी. हिरे उपस्थित होते. आभार कांचन चव्हाण हिने मानले. वडनेरभैरव परिसरवडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे संत जनार्दन स्वामी आश्रमात गुरुपौणिमा उत्सव साजरा करण्यात आला. भैरवनाथ मंदिरात देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस सुरेश सलादे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. दत्त महाराज, कुलस्वामिनी जोगेश्वरी, सलादेबाबा मंदिरात पूजन करण्यात आले. जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गुरुपौणिमेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. धोंडगव्हाण येथे गुरुपौणिमेनिमित्त पारंपरिक नृत्य, वाद्य, वादनाने राष्ट्रसंत जनार्दन स्वामी पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक आदिवासी नृत्य व कलशधारी महिला मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. मंगरूळ विद्यालय चांदवड : तालुक्यातील मंगरूळ येथील आदर्श नूतन माध्यमिक विद्यालयात गुरुपौणिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील देशमुख होते. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शिक्षक एस. बी. देशमुख, एस. व्ही. भांबर, पी. जी. जाधव, बी. टी. जाधव, एम. एन. शिंदे यांची भाषणे झाली. नामपूर महाविद्यालयमालेगाव : बागलाण तालुक्यातील नामपूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दिनेश शिरुडे होते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही. एन. पाटचील, टी. ए. गांगुर्डे, डॉ. के. व्ही कुऱ्हे, के. आर. शेलार, आर. एम. सूर्यवंशी आदि उपस्थित होते. सौंदाणे जनता विद्यालयमालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य अे. आर. ठोके होते. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगितली. शिक्षक व्ही. एस. हाके यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक डी. डी. येवले, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन हाके यांनी, तर आभार अे. व्ही. पगार यांनी मानले.गिसाका वसाहतगिसाका : गिसाका कामगार वसाहत व येथील श्रीरामनगर येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गिसाका वसाहतीमधील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमानिमित्त सेवेकऱ्यांनी विविध पूजापाठ व मंत्रपठणाने गुरुपौर्णिमा साजरी केली. श्रीरामनगर (वाणीवस्ती) येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले. पालखी मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूल चांदवड : येथील एस. एन. जे. बी. स्व. डी. एम. भन्साळी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. मारणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समन्वयक वर्धमान लुकंड, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिव सावंत याने महर्षी वाल्मीकींची वेशभूषा केली होती. प्रांरभी गुरुपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन मयुरी छाजेड, सलोनी बाफना यांनी केले. सौ. एस.एस. पगार, सौ. योगीता पवार यांनी गुरुमहिमा विषद केला.
चांदवड तालुक्यात गुरूपौणिमा साजरी
By admin | Updated: July 14, 2014 00:35 IST