शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रांवर आता बंदूकधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:11 IST

महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षारक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला.

नाशिक : महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या कक्षाबाहेर एक शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमून इतर १७ बंदूकधारी सुरक्षारक्षक जलशुद्धीकरण केंद्रांसह गंगापूर धरणावर नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, राजीव गांधी भवनमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस शिवसेनेने आपला विरोध कायम ठेवला. महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे मुंबईतील महाराष्टÑ स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांच्याकडून एकूण ४५ सुरक्षारक्षक नेमण्यासाठी येणाºया १ कोटी ४३ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला होता. या सुरक्षारक्षकांमध्ये १८ बंदूकधारी सुरक्षारक्षक आहेत. यावेळी म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी राजीव गांधी भवनमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक नियुक्तीस विरोध दर्शविला. महापालिका मुख्यालयात बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी पोलिसांची नेमणूक करावी अथवा महापालिकेच्याच सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही तिदमे यांनी केली. जगदीश पाटील यांनी सांगितले, राजीव गांधी भवनमध्ये एवढ्या बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गरज नाही. त्याऐवजी सदर बंदूकधारी सुरक्षारक्षक हे मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर तसेच संवेदनशील ठिकाणी नेमण्यात यावेत.  पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेच्या कर्मचाºयांनाही प्रवेश करणे मुश्कील होते. जेथे आवश्यकता आहे तेथे बंदूकधारी सुरक्षारक्षक प्राधान्याने नेमावेत, नंतर राजीव गांधी भवनचा विचार करावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. चर्चेनंतर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी राजीव गांधी भवनमध्ये सर्वच बंदूकधारी सुरक्षारक्षकांची आवश्यकता नसून, आयुक्तांच्या दालनाबाहेर एकाची नियुक्ती करावी आणि इतरांची जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरणावर नेमणूक करावी, असे आदेशित केले.  दरम्यान, सूर्यकांत लवटे यांनी ऐन दिवाळीत अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याची तक्रार केली, तर जगदीश पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी इदगाह मैदान हे केवळ खेळासाठीच उपलब्ध करून देण्याची सूचना केली.