शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पोलिसांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरी फोफावली

By admin | Updated: November 26, 2015 22:34 IST

प्रभाग १७ : दिनकर पाटील यांचा आरोप

नाशिक : प्रभाग क्रमांक १७ मधील श्रमिकनगर, गंगासागरनगर, राधाकृष्णनगर, विष्णूनगर, धु्रवनगर, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर या भागात फोफावलेल्या गुंडगिरीला पोलीसच जबाबदार असून, त्यांच्या वरदहस्तामुळेच प्रभागात गुंडगिरी बोकाळली असून, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रभागात तातडीने शांतता बैठक घ्यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक दिनकर व लता पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले. सातपूर भागातील गुन्हेगारीच्या आकडेवारीचा आलेख वाढत असून, त्यामध्ये प्रभाग १७ मधील नगरांचा अधिक सहभाग आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात पाच खुनांच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांची खोड काढणे, महिलांची छेड काढणे असे प्रकार नित्यनियमाने घडत असल्याने सायंकाळी सात वाजेनंतर महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. दरम्यान, याबाबत वेळोवेळी गंगापूर तसेच सातपूर पोलीस ठाण्यात निवेदने देऊन गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांकडून याची दखलच घेतली जात नसल्याने गुंडगिरी फोफावली आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांना प्रभागातील नागरिकांनी गुंडांच्या नावाची यादी दिली आहे, तरीदेखील ते कारवाईस टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी शंका वाटत असल्याचा आरोपही यावेळी निवेदनात केला आहे. प्रभागातील कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट राहावी याकरिता तातडीने शांतता बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी पाटील दाम्पत्याकडून करण्यात आली.