शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्वच शाळांमध्ये गुलाबपुष्पाने नवागतांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 23:55 IST

शहरातील सर्वच शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू झाल्या असून, शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून तसेच गुलाबपुष्प देऊन औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

नाशिक : शहरातील सर्वच शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू झाल्या असून, शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. शहरात अनेक शाळांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून तसेच गुलाबपुष्प देऊन औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. गंगापूररोडवरील वाघ गुरुजी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप आणि नवागतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रमेश गायखे,बाळासाहेब पाटील, अशोक रकिबे, आशिष पाटील, रसिका शिंदे, रंजना घुले आदी उपस्थित होते. इशस्तवन व स्वागतगीतानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक वनिता शिरसाठ यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुस्तके व खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मंगला गुळे यांनी सूत्रसंचालन केले.चौव्हाण गर्ल्स हायस्कूलश्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये नवागतांचे स्वागत उत्साहात करण्यात आले. शाळेत वर्षारंभ उपासनेची सुरुवात सकाळ सत्रात रोहिणी कुलकर्णी व दुपार सत्रात प्राची सराफ यांनी वेदातील श्लोकातून सर्व विद्यार्थिनींना अभ्यास, आहार व शिस्तपालन यांचे महत्त्व सांगितले. उपमुख्याध्यापक सुरेश दीक्षित, पर्यवेक्षक माधव मुठाळ, प्रतिमा खैरनार, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष देशमाने यांंच्या हस्ते विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आली.नवरचना शाळागंगापूररोड येथील नवरचना प्राथमिक शाळेत नवागतांचे पाठ्यपुस्तक, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम ठोके, मधुकर फटांगरे आदी उपस्थित होते. स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी गायकवाड यांनी आभार मानले.आनंदवली येथील मनपा शाळाआनंदवली येथील महानगरपालिका शाळा क्र मांक १८ मध्ये प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत, पुस्तक दिंडी व प्रभात फेरी काढण्यात आली. अध्यक्षस्थानी भीमराव कडलग होते. प्रारंभी सरस्वतीपूजन करण्यात आले. इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या मुला-मुलींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊसाहेब पूरकर, अनंत दुसाने, शरद मंडलिक, वसंतराव एकबोटे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख कैलास ठाकरे यांनी, तर सूत्रसंचालन कल्पना पाटील यांनी केले. अरु णा पिंगळे यांनी आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे निवृत्ती शेवरे, हरिदास भुसारे आदींसह पालक उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा