शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या ओढीने मुलीची पायी गुजरातवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:37 IST

गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत : चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही. गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव्हा ना चॉकलेट, ना आईस्क्रीम ना कुठलीही गोड मिठाईची गरज भासते. त्यापेक्षाही कितीतरी अधिक गोड आनंद असतो तो आईच्या कुशीत विसावण्याचा. अशीच एक हृदयस्पर्शी घटना पिंपळगाव येथील घडली आहे. आईच्या ओढीने गुजरातकडे पायी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : पोलिसांच्या मदतीने कुटूंबाच्या स्वाधीन

गणेश शेवरे, पिंपळगाव बसवंत :चुकली दिशा तरीही, ओढ तुझी मिटणार नाही, आई तुझ्या ओढीने, धीर माझा सुटणार नाही.गर्दीत जर आईचा हात सुटला तर आईसह ते मूल किती कासावीस होते. त्याला कितीही लालसा दिली तरीही ते आपल्या आईलाच शोधत असते आणि जेव्हा आई समोर येते तेव्हा ना चॉकलेट, ना आईस्क्रीम ना कुठलीही गोड मिठाईची गरज भासते. त्यापेक्षाही कितीतरी अधिक गोड आनंद असतो तो आईच्या कुशीत विसावण्याचा. अशीच एक हृदयस्पर्शी घटना पिंपळगाव येथील घडली आहे. आईच्या ओढीने गुजरातकडे पायी जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे.पिंपळगाव बसवंत येथील पोलिसांना परिसरातील वणी रोड येथे एक ११ वर्षांची मुलगी सापडल्याची माहिती मिळाली. लहान मुलगी असल्याने पोलिसांनी तातडीने आणि गंभीरपणे तपास करण्यास सुरुवात केली. तपासात सदर मुलगी गुजरात येथील असल्याचे समजले. एक दाम्पत्य कामानिमित्त निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील प्रगतिशील शेतकरी कुंभार्डे यांच्याकडे आले असता खेळता खेळता त्यांची ११ वर्षांची मुलगी अनिषाबेन दिसेनाशी झाली. काही वेळानंतर ती हरवल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले आणि तिचा शोध सुरू झाला. सकाळी सुरू झालेली ही शोधमोहीम संध्याकाळपर्यंत चालली. तरीही ती आढळून आली नाही. तोपर्यंत तिच्या आईला याची खबर देण्यात आली नव्हती.दरम्यान, अनिषाबेन मनूभाई दिवा आपल्या आईच्याच ओढीने गुजरातच्या दिशेने पायी निघाली होती. वणीहून पिंपळगावच्या दिशेने येत असलेल्या हट्टी येथील तरुण कैलास धुळे यांना सदर मुलगी अंतरवेली फाट्यावर पिंपळगावच्या दिशेने येताना दिसली. मुलगी रडत असल्याने त्यांनी तिची विचारपूस केली तर तिच्या भाषेवरून ती गुजरातची असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी तिला नागरिकांच्या मदतीने पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावशे यांच्याशी संपर्क साधून स्वाधीन केले.पावशे यांनीही तातडीने तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली अन् अवघ्या तासाभरात ही शोधमोहीम थांबली. पोलिसांनी चिमुकलीला पोलिसांच्या स्वाधीन केले तेव्हा कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याप्रसंगी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे, चंद्रभागा कराड आदी उपस्थित होते.आईची माया आणि ओढ काय असते याची अनेक उदाहरणे आजपर्यंत बघितली आहेत. मात्र नवरात्रात त्या वाट चुकलेल्या चिमुकल्या नवदुर्गाच्या घरच्यांचा शोध लावत तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करताना जो अनुभव मिळाला तो मन प्रसन्न करणारा होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या हातून एक चांगले काम घडल्याचे समाधान मिळाले.- पुंडलिक पावशे, पोलीस उपनिरीक्षकफोटो- १७ पिंपळगाव पोलीस

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक