पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.नाशिक ते राजबारी चेकनाकादरम्यान मनपा हद्द ते रामशेज, आंबेगण ते सावळघाट व वांगणी ते राजबारी फाटा या जवळपास १५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर कॉँक्रिटीकरणाऐवजी डांबरीकरण करण्यात आल्याने दरवर्षी पहिल्याच पावसात मोठमोठे खड्डे पडतात. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने लहान वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. खड्डे टाळताना वाहनधारकांना खो-खोचा खेळ खेळावा लागत आहे. सावळ घाट व कोटंबी घाट रस्त्याचे रूंदीकरण करताना अवघड वळणे तशीच राहिल्याने अवजड वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. कोटंबी घाटाच्या पायथ्याशी शाळा, प्रवासी निवारा शेड व मानवी वस्ती असल्याने या ठिकाणी वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत घडणाºया अपघातांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुजरात महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:01 IST
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर गुजरात राज्याच्या सरहद्दीपर्यंत साधारण १५ किमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गुजरात महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
ठळक मुद्देअवघड वळण : अपघातांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंता