शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:12 IST

कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचविण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला सरदवाडी येथील कृषी सहायक नागरे यांनी दिला.

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचविण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला सरदवाडी येथील कृषी सहायक नागरे यांनी दिला.युवा मित्र संस्था व सिजेंटा इंडिया लि. च्या सहकार्याने सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबकवरील कांदा लागवड-खत आणि कीड व रोग व्यवस्थापन तसेच कृषी विभागाच्या योजनांचा मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी कार्यक्रम सरदवाडी येथील उत्तम शिरसाठ यांच्या कांदा क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. युवा मित्र संस्था २५ वर्षांपासून पाणी व्यवस्थापन, महिला उपजीविका, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अजित भोर, दिनेश ठोंबरे, सुधीर मोराडे उपस्थित होते. मोराडे यांनी युवा मित्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. ठोंबरे यांनी ठिबक संच चालविताना घ्यावयाची काळजी, स्क्रीन फिल्टरची स्वच्छता याविषयी माहिती सांगितली. सिन्नर तालुक्यातील सततचा कमी पडणारा पाऊस व उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे, ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने १५ गावांमध्ये २५० शेतकऱ्यांसोबत २५० एकरावर हा प्रकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदा लागवड करताना रोपवाटिका व्यवस्थापन, ठिबकवरील कांदा लागवड पद्धती, कीड व रोग, त्याचे व्यवस्थापन विद्राव्य खत व्यवस्थापन या विषयावर नागरे यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :water shortageपाणीकपातAgriculture Sectorशेती क्षेत्र