नायगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.जोगलटेंभी येथे मालेगाव येथील मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत विक्रम भास्कर याने जोगलटेंभी येथे बोर्डो मिश्रण तयार करण्याचे, वापरण्याची योग्य पद्धत व फायदे तसेच बोर्डो मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले. यावेळी निविष्ठांचे वेळेवर उपलब्ध कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी.के. सूर्यवंशी, शिक्षिका वाळुंज यांचेही मार्गदर्शन लाभले.यावेळी गावातील श्री नंदकिशोर शेळके, भाऊसाहेब कमोद, रामनाथ पवार, बाळासाहेब जेजूरकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
नायगाव परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:51 IST
नायगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नायगाव परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ठळक मुद्देशेतकऱ्यांना बोर्डी मिश्रणाबाबत मार्गदर्शन