शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खेड येथे शेतकऱ्यांना शेळीपालनसंदर्भात मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:29 IST

नांदूरवैद्य : आज शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळणे व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी शेळीपालन, गायी, म्हशी पाळणे आदी व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

ठळक मुद्देअनेक महत्त्वपूर्ण विषयांवर तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन

नांदूरवैद्य : आज शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन पाळणे व त्यापासून भरघोस उत्पन्न मिळवून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी शेळीपालन, गायी, म्हशी पाळणे आदी व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील चंद्रवेल खेड येथे शेतकºयांच्या उन्नतीसाठी शेळीपालन व्यवसायासंदर्भात अध्यक्ष चंद्रकांत खाडे यांच्यासह विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.विश्वास, भांडवल, दूरदृष्टिकोन, गोपनीयता व सामाजिक बांधिलकी या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितच शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळण्यास फायदेशीर ठरेल असे मत अध्यक्ष चंद्रकांत खाडे यांनी व्यक्त केले. या शिबिरात शेळीपालन व्यवसायाविषयी विविध योजनांची माहिती, व्यवसायविषयक मार्गदर्शन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांना अनुकूल वातावरण, स्वच्छता, कर्जसुविधा, विमा संरक्षण, आॅनलाइन फॉर्म भरणे, जनावरांसाठी खाद्य व उपचारपद्धती, तसेच वन्यप्राणी असलेल्या ठिकाणी सहली आयोजित करणे आदी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर तालुक्यातील उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले. शेळीपालन व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किफायतशीर ठरलेला आहे. शेळीपालनाचे फायदे व त्यापासून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याविषयी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ.नरवाडे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी डॉ. झाडे, पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त देशमुख, इगतपुरीचे पशुसंवर्धन विभागाचे डॉ. कांगणे, डॉ.कुलकर्णी, डॉ. सय्यद, तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार तंवर, रणजित आंधळे, विवेक सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. या शिबिरात गोट फार्म प्रोड्यूसर कंपनीने शेळीपालन व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी कसा व किती उपयुक्त आहे यावर चर्चा घडवून आणली.याप्रसंगी नामदेव जाधव, सचिव दत्तात्रय कुंदे, गेणू डगळे, अशोक भांगरे, चांगदेव गतीर, रोहिदास गोवर्धने, तानाजी किरवे, राजाराम गुळवे, समाधान कालेकर, रोशन दातीर, प्रवीण शिंदे, वैशाली कळसे, लक्ष्मी गतीर आदींसह तालुक्यातील शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी