नाशिक : शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पेतून मेंढी (ता. सिन्नर) येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात बांधण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा बुधवार (दि. २५) रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग, निराधार व गरजू विद्यार्थ्यांना येथे स्पर्धा परीक्षासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे, छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर यांनी शुक्रवारी (दि.२०) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्र मास खासदार हेमंत गोडसे, खासदार संभाजी महाराज, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भास्करगिरी महाराज, बद्रीनाथ महाराज तनपुरे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुमंतबापू हंबीर, उद्योजक डॉ. संजय मालपाणी, माजी आमदार राजाभाऊ वाजे आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रा. उमेश शिंदे, मधुकर गिते, विकास काळे, योगेश गांगुर्डे, वैभव दळवी, बाळकृष्ण तनपुरे, वरुण तनपुरे, नीलेश शिंदे, संकेत पेखळे आदी उपस्थित होते.मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष मधुकर गिते यांनी शिवाश्रमासाठी ५० गुंठे जमीन दानस्वरूपात दिली आहे. समाजातील दिव्यांग घटक आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची स्वप्न बाळगणाऱ्या तरु णांना येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारातून आर्थिक पाठबळ निर्मिती हा या केंद्राचा हेतू आहे. दिव्यांग बांधव, निराधार आणि गरजू यांच्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. शिवाश्रम बांधकामासाठी समाजातील अनेक दानशुरांकडून मदत केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शिवाश्रमातून दिव्यांग, निराधार, गरजूंना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:29 IST