सिडको : अपंग महामंडळ नाशिक यांच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१४-२०१५ या चालू वर्षात महामंडळाने वसुलीत महाराष्ट्रात उच्चांक गाठला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी दिली.या शिबिरात लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच १८ लाभार्थींना कर्जवाटप व १४ लाभार्थींना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. कार्यक्रमास महाव्यवस्थापक नंदकुमार कुले, जिल्हा व्यवस्थापक अशोक मुगदल, गंगाधर डोईफोडे, गणेश लोंढे, स्वप्नील चौधरी, दीपाली दुसाने आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
अपंग महामंडळातर्फे मार्गदर्शन शिबिर
By admin | Updated: April 30, 2015 00:08 IST