शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिथी उद्गारतात, ‘वाह...नाशिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:25 IST

नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे.

नाशिक : नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाइन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाची. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभिकरणामुळे महामार्गावरून शहरात येणाºया अतिथींच्या मुखातून सहजरीत्या ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार पडत असावे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर मधोमध हिरवाई बहरल्याचे चित्र पहावयास मिळते. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभल्याने सौंदर्य खुलले आहे. य्मुळे उड्डाणपुलाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. केवळ सुशोभिकरणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव म्हणून त्यांचे आकर्षक रेखाटलेल्या छायाचित्रांपासून तर रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ, बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरून शहरात येणाºया पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच लाभलेले हिरवाईचे कोंदण आणि भिंतींसह खांबांवरील चित्राकृती बघून पाहुण्यांच्या मुखातून ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार सहज बाहेर पडतात.उड्डाणपुलाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून लक्ष वेधून घेत आहे. विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहेत. तसेच उड्डाणपुलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत. नाशिकच्या उड्डाणपुलाखाली करण्यात आलेले सौंदर्यीकरण अन्य शहरांमधील उड्डाणपुलासाठीदेखील आदर्श ठरणारे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका