शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल वाहतुकीपेक्षा हमीभाव अनुदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:07 IST

ओझर : नुकतीच केंद्र सरकारने शेतमाल, द्राक्ष व ॲपलबोरच्या रेल्वे वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी दिली असली, तरी तो फायदा थेट ग्राहकांना होणार असल्याने मूळ शेतकऱ्याला हमीभावासाठी करावी लागणारी कसरत व होणारे नुकसान पाहता, सक्तीची हमीभाव योजना हवी असल्याचे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनिफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी : अस्मानी संकट

कित्येक वर्षांपासून शेतकऱ्याला अनेक अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासले आहे. यात शेतमाल पिकविताना जो मूळ खर्च लागतो, तो दिवसेंदिवस वधारत असताना तो पिकवून विक्रीसाठी नेण्यापर्यंत ठरणारा भाव हा जुगारासारखा झाला आहे. वास्तविक लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यावर सरकारने विचार करणे गरजेचे असताना, वाहतुकीवर सबसिडी देऊन शेतकऱ्यांचे काय भले होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. द्राक्षाला वर्षभर एकरी लाखोंचा खर्च येतो, परंतु दरवेळी आलेला हंगाम कुठल्या तरी संकटाला बळी पडतो. परिणामी, उत्पन्न दूर राहते आणि त्याला पिकविण्यासाठी लागलेला खर्चही वसूल करणे जिकरीचे झाले आहे. असेच प्रकार इतर शेतमालाच्या बाबतीतही लागू होतात. प्रत्येक शेतकऱ्याला समूह उत्पन्नाची अपेक्षा असताना मागणी पुरवठ्याच्या जाळ्यात त्याचाच नाहक बळी जात असल्याचे सद्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस तंत्रयुक्त होत असलेल्या केंद्राने शेतमालाच मंदीच्या काळात हमीभावाच्या सबसिडीचे धोरण अवलंबले, तर शेती प्रधानतेला आर्थिक बळकटी मिळेल. म्हणूनच शेतमाल वाहतुकीला कृषी एक्स्प्रेसद्वारे निम्मी सबसिडी देण्यापेक्षा मूळ शेतमालाला आर्थिक हमी देणे गरजेचे असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनाही युनिक आयडीची गरजभारतात सामान्य माणसाला आधार कार्ड, शिक्षकाला शालार्थ आयडी, कर भरणाऱ्याला पॅन कार्ड असताना, शेतकऱ्यालाही त्याच्या क्षेत्रनिहाय कृषी आयडी दिल्यास, त्यावर लागवड केलेलं पीक, बाजारात मिळालेला भाव याची ऑनलाइन ट्रॅकिंग करणे सोपे होईल, शिवाय त्याने कष्ट करून पिकविलेल्या मालाचा मोबदलाही त्याला थेट केंद्राकडून मिळेल. यात सरकारचे इतर सबसिडीत जाणारे अनुदान बघता, हे परवडणारे ठरेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.प्रती एकर लागणारा खर्चद्राक्ष - दोन ते अडीच लाख ₹टोमॅटो - सुमारे एक लाख ₹कांदा - ४० ते ४५ हजार ₹सिमला मिरची : ९० हजार ते १ लाख ₹फ्लॉवर, कोबी, आलं, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू : २० ते ३० हजार ₹

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती