शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

जीएसटी विभागाची ‘सबका विश्वास’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:41 AM

जीएसटी विभागाने नव्याने ‘सबका विश्वास’ योजना आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून संपूर्ण सूट मिळणार असून, करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. तसेच करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले, ज्यांना परताव्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

सातपूर : जीएसटी विभागाने नव्याने ‘सबका विश्वास’ योजना आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून संपूर्ण सूट मिळणार असून, करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. तसेच करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले, ज्यांना परताव्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अशा करदात्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज आयुक्त के. व्ही. एस. सिंग यांनी दिली.निमा व जीएसटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीएसटी आउटरिच प्रोग्रॅम’मध्ये ते बोलत होते. सिंग यांनी पुढे सांगितले की, ‘सबका विश्वास’ योजनेअंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. कोणतेही व्याज नाही, दंड नाही, फिर्यादही नाही. संपूर्ण सूट मिळण्याबरोबरच करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. करदात्यांसाठी ही विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी आयुक्त (अपील) नवनीत, अतिरिक्त आयुक्त ए. जे. वर्मा, डी. एस. मीना यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास बोरसे यांनी केले. तुषार चव्हाण यांनी आभार मानले.यावेळी निमाचे नितीन वागस्कर, श्रीपाद कुलकर्णी, रावसाहेब रकिबे, उदय रकिबे, कैलास आहेर, एम. जी. कुलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ आदींसह उपस्थितांनी शंकांचे निरसन करून घेतले. याप्रसंगी उद्योजक, जीएसटी विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.करदात्यांना मिळू शकतो लाभजीएसटी विभागाची ही योजना दि. १ सप्टेंबर २०१९ पासून सुरू होत असून, पुढील चार महिने कार्यान्वित असणार आहे. जीएसटी संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया विविध स्तरांतून येत आहेत. ज्यांच्या प्रतिक्रिया व अपिलांची दि. ३० जून २०१९ पर्यंत सुनावणीत कोणत्याही करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे, ज्यांना परताव्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे अशा करदात्यांना या स्कीमचा लाभ मिळू शकतो. योजनेची सविस्तर माहिती जीएसटी व सेंट्रल एक्साइज विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे आयुक्त के.व्ही.एस.सिंग यांनी दिली.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयGSTजीएसटी