शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मोलमजुरी करून हाकतात वृद्धाश्रमाचा गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:29 IST

शिक्षण केवळ इयत्ता सातवी अन् विशेष म्हणजे स्वत: मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवित असताना आपणही जगाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एका दांपत्याने वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

शेखर देसाई ।लासलगाव : शिक्षण केवळ इयत्ता सातवी अन् विशेष म्हणजे स्वत: मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवित असताना आपणही जगाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एका दांपत्याने वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.  येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले शिरसगाव येथील प्रियंका व नवनाथ नारायण जºहाड दांपत्याचे नाव आहे. लासलगाव येथील राजा शिवछत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते संजय बिरार, अजय धनवटे, डॉ. अरुण काळे व डॉ. नीलेश दळवी हे परिसरातल्या विविध गावात भेटी देऊन अभ्यास करीत असतात. येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसगाव लौकी येथे भटकंती करीत असताना कोणताही गाजावाजा न करता नवनाथ जºहाडे हे त्यांच्या गावी छोट्याशा घरात वृद्धाश्रम गेली चार वर्षांपासून चालवत असल्याची माहिती समजली. त्यामुळे लागलीच त्यांचे पाय आपसूकच या आगळ्या वेगळ्या वृद्धाश्रमाकडे वळले. थोडीफार शेती असणारे नवनाथ जºहाड यांच्या परिवारात पत्नी प्रियंका यांची मोलाची साथ आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. स्वत: नवनाथ शेतात मोलमजुरी करतात. प्रियंका या लोकांच्या शेतात कांदे लावणीची व मशागतीची मजुरी करतात. या पती पत्नी यांच्या मजुरीतून येणारे पैसे या पाच जणांच्या खर्चावर देऊन देखभाल करतात. नाशिक, विंचूर, चंद्रपूर, शेवगाव येथील पाच आजी- आजोबांचा पोटच्या मुलापेक्षाही अधिक चांगला सांभाळ करीत आहे. कमी शेती असूनही काही जागा नवीन बांधकामाकरिता या जºहाड परिवाराने दिली आहे. अजून वीस वृद्धांची व्यवस्था करण्यासाठी आश्रमाचे काम त्यांनी चालू केले आहे.शिरसगाव येथे एका नागपूर परिसरातील नाव न सांगणाºया तपस्वीला वय जादा झाल्याने व प्रकृती खालावल्यामुळेएकांतात आणले गेले. त्यांची सेवा केली. वृद्धाश्रमातील सातपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे क्रि या कर्म नवनाथ व प्रियंका यांनी केले.