शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

‘ग्रुप स्टडी’ हाच यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:26 IST

नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीकेले.

ठळक मुद्देसुर्यवंशी : वाणी मित्र मंडळाच्या ‘शिक्षण विश्व’ मध्ये प्रतिपादन

नाशिक : स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो, असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ' ग्रुप स्टडीच्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीकेले.कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षणविश्व या कार्यक्रमात आॅनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक डॉ.अविनाश धर्माधिकारी, मुंबई येथील जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश कोठावदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बऱ्याचदा अपयश आल्यास आपण खचून जातो, मात्र मित्रांनीबळ दिल्यास पुन्हा आपण जोमाने यशाच्या मागे लागतो , त्यातूनच निश्चित ध्येय गाठतो असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे, संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, विश्वस्त योगेश मालपुरे, दिपक बागड, सुनील फरांदे, नंदकिशोर कोठावदे, संजय शिरूडे, महेश उदावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरचिटणीस महेश पितृभक्त, उपाध्यक्ष संजय दुसे, संजय बागड, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार निलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, ?ड. देवदत्त सायखेडकर व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले.डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, स्वत:ला ओळखून क्षेत्र निवडायला हवे, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हावे हेच स्वत:च्या जडणघडणीचे सूत्र आहे. त्यामुळे कागदवरचे गुण म्हणजे बुद्धीमत्ता असे म्हणता येणार नाही, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले. तर निलेश कोठावदे यांनी एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. समाजसेवेऐवजी नोकरीचे साधन म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे बघायला हवे, असे ते म्हणाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी