शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्कमध्ये टाकाऊ वस्तूंपासून उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:11 IST

एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

एकलहरे : एकलहरे वीज केंद्र वसाहतीतील पीस पार्क उद्यानामध्ये टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पीस पार्कमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.  एकलहरे वसाहत आॅफिसर्स क्लबजवळील पीस पार्क उद्यानामध्ये मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूंतून टिकाऊ कलाकृती उभारण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी व सर्वांना व्यायामासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पीस पार्क उद्यानाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.  जनरेटर ट्रान्सफॉर्मरच्या वापरलेल्या बुशिंगपासून बनविलेला रंगीत प्रकाशमय कारंजा, अग्निशमन यंत्रणेच्या साहित्यापासुन पक्षी निवारा घरटे, मोशन सेन्सरद्वारे बनविलेल्या प्रकाश योजनेमुळे ऊर्जा बचत करण्यात आली आहे. पार्कच्या मध्यभागी उंचवटा तयार करून त्यावर लॉन्स लावण्यात येऊन आजूबाजूला गुलाब व शोभेची झाडे लावण्यात आली आहे. पार्कमध्ये फिरण्यासाठी ४३० मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार करून साऊंड सिस्टीम लावण्यात आली आहे. व्यायामासाठी ग्रीन जिम बसविण्यात आली असून मोठ्या वृक्षांच्या सभोवती पार बांधण्यात आल्याने त्यांचा उपयोग योग साधनेसाठी होऊ लागला आहे.झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन योजनेची व्यवस्था करण्यात आली आहे. सेल्फी काढण्यासाठी स्वयंप्रतिमा कक्ष बाष्पक व बाष्पचक्र दुरुस्ती विभागाकडुन उभारण्यात आला आहे. रंगीबेरंगी रिबीन, रंगीत छत्र्या व काचेच्या बाटल्यांचे आकर्षक वृक्ष तयार करून सजावट करण्यात आली आहे. कोळसा हाताळणी विभागाने प्लॅस्टिकच्या निरूपयोगी बाटल्यांची सुंदर कमान उभारली असून त्यात रंगीत लायटिंग करण्यात आली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र किलबिल पार्कची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये जुन्या टायरपासून कोंबडा, झुला, सूर्य, बेडूक, हसरे चेहरे, वात कुक्कुट, घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ आदी खेळणी बसविण्यात आली आहेत.पीस पार्कचे नूतनीकरण करताना खेळणी, रंगरंगोटी, व्यायामाचे साहित्य, स्वच्छता आदींची योग्य सांगड घालण्यात आल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.वारली पेंटिंगने सजावटउद्यानात झाडांच्या अवतीभोवती बांधलेल्या पारावर व इतर ठिकाणी वारली पेंटिंग करून सजावट करण्यात आली आहे. तसेच उद्यानात विश्रामकुटी बांधण्यात आली आहे. जुन्या झाडांच्या ओंडक्यांना आकर्षक रंगकाम करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक