शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहरात टिळक, साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:40 IST

नाशिक : शहर परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देकार्यक्रमांचे आयोजन : फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत संस्था-संघटनांतर्फे प्रतिमापूजन, शाळांमध्ये विविध स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.नाशिकरोड येथील श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आॅनलाइन गुगल मिटवर साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संदीप सरोदे होते. प्रारंभी तनिष्का सोनार हिने शाळेची नित्य प्रार्थना सादर केली. साक्षी बुºहाडे या विद्यार्थिनीने टिळक व साठे यांचे काढलेल्या चित्राचे पूजन केले. स्वागत गीत स्वराली देशपांडे हिने सादर केले. लोकमान्य टिळकांची मराठीमधूनप्रिती मेंढे, संस्कृतमधून सानिका ब्राह्मणकर, सायली चौधरी, इंग्रजीतून क्र ांती सरोदे व पीपीटीद्वारे श्रद्धा क्षत्रिय हिने माहिती सादर केली. अण्णा भाऊ साठे यांची माहिती वैभवी सोळसे हिने सादर केली. देवळालीगावात रक्तदान शिबिर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती देवळालीगाव येथे प्रतिमापूजन व रक्तदान करून साजरी करण्यात आली. देवळालीगाव लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगर येथे लहुजीनगर मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी सकाळी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन आमदार सरोज अहिरे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, जगदीश पवार, नगरसेविका सुनीता कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. आभार आयोजक नानासाहेब खंडाळे यांनी मानले. यावेळी दिलीप मरसाळे, मनोहर कोरडे, अमोल आल्हाट, चंदू साडे, विक्र म कोठुळे, साहेबराव शृंगार, सूर्यकांत भालेराव, रवींद्र पाटील, सागर निकाळे, किरण राक्षे, अजय लोंढे, वाल्मीक लोंढे, कालिदास चव्हाण, दशरथ सपकाळे, रामचंद्र चव्हाण, योगेश नवगिरे, विजय खंडाळे, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :city chowkसिटी चौकLokmanya Tilakलोकमान्य टिळक