शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन : जयोस्तुते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:36 IST

नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.स्वागत कक्ष येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, रोहिदास दोरकूळकर, सहायक आयुक्त ए. पी. वाघ, मुख्यलेखापरीक्षक महेश बच्छाव, ...

नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.स्वागत कक्ष येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, रोहिदास दोरकूळकर, सहायक आयुक्त ए. पी. वाघ, मुख्यलेखापरीक्षक महेश बच्छाव, मुख्यलेखाधिकारी सुभाष भोर, शहर अभियंता संजय घुगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, डॉ. प्रमोद सोनवणे, आकाश बागुल, गोरखनाथ आव्हाळे, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, उदय धर्माधिकारी, नितीन वंजारी, प्रशांत मगर, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, हिरामण जगझाप आदी उपस्थित होते.युवक मित्रमंडळाच्या वतीने अभिवादननवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामी नारायणनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावरकरांच्या ग्रंथाचे पूजन व पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, शैलजा माळोदे, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, सोमनाथ बोडके, जयवंत बागुल, विष्णु महाजन, बाळासाहेब पवार, मधुकर वाबळे, टी. पी. किरंगे, दामोदर शेलार, शशिकांत बोराडे, दिलीप बडगुजर, अनंत जाधव, प्रकाश सोनवणे, किरण अधिकारी, भालचंद्र कुर्जेकर, महेश कापडे, सुनील फरताळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘बागेश्री’तर्फे अभंग गायननाशिक येथील ‘बागेश्री’ वाद्यवृंदाच्या वतीने पोवाडा, नाट्यपद व अभंग आदींंद्वारे स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. भगूर येथील त्यांच्या जन्मभूमी स्मारकात सकाळी हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सावरकर यांचे नातू रणजित सावरकर उपस्थित होते. त्यानंतर तानाजी मालुसरेंचा पोवाडा, ‘अनादी मी’, ‘जयोस्तुते’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘शतजन्म शोधताना’, ‘ने मजसी ने’, ‘डोळेभरून देवास मला पाहू द्या’, ‘ती अमर होय वंशलता’ यासारखी गाणी गायक राजेंद्र सराफ, साक्षी झेंडे, अर्चना जोशी, दीपक दीक्षित, शर्वरी पद्मनाभी, रुचा झेंडे, श्रेया गायकवाड, जास्वंदी जोशी आदी कलाकारांनी मैफलीत सादर केली. रसिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीता कºहाडकर यांनी निवेदनाद्वारे प्रत्येक गाण्यामागील पार्श्वभूमी, त्याच्या आठवणी सांगितल्या. निर्मिती संकल्पना चारुदत्त दीक्षित यांची होती. प्रारंभी डॉ. मृत्युंजय कापसे, रामदास आंबेकर, एकनाथ शेटे, ऋषीकेश गायकवाड आदींनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रतापराव गायकवाड, विलास कुलकर्णी, खैरनार, राजेश सूर्यवंशी, शीतल झेंडे, प्रफुल्ल चव्हाण आदी उपस्थित होते.सावरकर एकता संघटना : पिंपळचौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेतर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना जयंती सोहळ्यात अभिवादन करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे एकनाथ शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील परदेशी, अ‍ॅड. अरुण माळोदे, नगरसेवक वत्सला खैरे, बबलू खैरे, कल्पना पांडे, संजय सानप, शंतनू परदेशी, नितीन धुमाळ, अ‍ॅड. किरण विचारे, अ‍ॅड. जयंत वाटपाडे, संजय खैरे, राम ठाकूर आदी उपस्थित होते.धनलक्ष्मी शाळा : पाथर्डीफाटा येथील धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थापक प्रकाश कोल्हे व मुख्याध्यापक ज्योती कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल जाधव, सारिका पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर