नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर परिसरातील शिवसेना शाखा व सिडको विभाग शिवसेनेच्या वतीने हिंंदू रक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सिडकोतील सावतानगर येथे मनपा माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी हर्षा बडगुजर, नाना पाटील, रमेश उघडे, दादाजी अहिरे, सुनील पाटील, सुधाकर जाधव, पवन मटाले, पिंटू भामरे, नीलेश कुलथे, जगन्नाथ कुऱ्हे, यशवंत गायकवाड, गोपीनाथ सोनवणे, पी. ए. पाटील, वसंतराव जगताप, विमल जाधव आदिंनीही बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.शिव छत्रपती क्रीडा मंडळराजे संभाजी स्टेडियम येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंडळाचे संस्थापक मामा ठाकरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी श्री शिव छत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ व सुविधा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोगनिदान आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच क्रीडापे्रमी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सुरेश देवरे, सुनंदा गाडे, आबा सोनवणे, रोहित भाटीया, डॉ. प्रीतम आहेरराव, डॉ. सुरज मराठे, विठ्ठल रंधवा आदि उपस्थित होते. आभार बाळ भाटीया यांनी मानले.जुने सिडको, बडदेनगर जुने सिडको, बडदेनगर येथे माजी नगरसेवक सीमा बडदे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी रमेश उघडे. सतीश खैरनार, सुशील बडदे, सचिन फरकांडे, प्रीतम बोराटे, शोभा गटकळ, शोभा दोंदे, भारती मुठाळ, ज्योती सौंदानकर, विजया फरकांडे, पारू इंगळे आदि उपस्थित होते. तसेच प्रवीण तिदमे यांच्या वतीनेही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ननू मोहिते, आकाश शिंदे, नाना पाटील, रमेश उघडे, दादाजी अहिरे, माजी नगरसेवक सीमा बडदे, शोभा दोंदे, शोभा गटकळ आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.वह्यांचे वाटपशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीप्रसंगी अटलबिहारी वाजपेयी शाळेत विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना नगरसेवक सचिन मराठे यांच्यासमवेत मुख्याध्यापक शैला शेजवळ, सुनील पवार, प्रशांत पाटील, वर्षा दाणी, श्रृती हिंगे, सुनंदा पाटील, मंदाकिनी खैरनार, प्रशांत साबणे, बंडोपंत कुलकर्णी, संजय सदावर्ते, विजय इंगळे, उल्हास भोसले, सुनील संकलेचा, विद्यार्थी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘राजगड’ कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपअध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाला मनपा सभागृह नेते सलिम शेख, नगरसेवक संदीप लेनकर, मनोज घोडके, सचिन भोसले, सुरेश भंदुरे उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By admin | Updated: January 25, 2016 00:15 IST