शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:15 IST

गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.

नाशिक : गेल्यावर्षी राज्यात १ जून पासून झालेल्या शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशातील मंदसौर येथे शेतकºयांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकºयांसोबतच आजपर्यंत शेतकºयांच्या विविध प्रश्नांसाठी बलिदान देणाºया शेतकºयांना शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले.  शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन देऊनही महाराष्ट्र शासनाने ते पाळले नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभर आंदोलन उभे राहिले. यात शहीद झालेल्या शेतक-यांना अभिवादन करतानाच शेतमालाला हमी भाव द्यावा, दुधाला हमीभाव द्यावा, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत विधेयक मंजूर करून कायदेशीर मार्गाने शेतकºयांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एकीकडे संपूर्ण देशभरात राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंचाने १ जूनपासून देशव्यापी संप पुकारला असला तरी नाशिक जिल्हा शेतकरी सुकाणू समितीने या संपात सहभागी न होता शेतकºयांच्या प्रश्नासाठी बलिदान देणाºया शेतकºयांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हुतात्मा स्मारकात झालेल्या या अभिवादन सभेप्रसंगी समिती सदस्य अमृता पवार, चंद्रकांत बनकर, हंसराज वडघुले, राजू दसले, समाधान भारतीय, प्रभाकर वायचळे, कैलास खांडबहाले, वैभव देशमुख, नाना बच्छाव, नितीन रोटे पाटील, योगेश कापसे, वैशाली डुंबरे, वैशाली पाटील, चारुशीला देशमुख, संपत जाधव, सोमनाथ बोराडे, डॉ. अनुपमा मराठे, अभय सूर्यवंशी आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.  सध्या खरिपाची तयारी सुरू असून, यंदा समाधानकारक पाउस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चांगले उत्पादन होऊन शेतकºयांना दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकºयांचे नुकसान होऊ नये याकरिता आम्ही संपात सहभागी झालेलो नाही. शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेत विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकारने विशेष संसदीय अधिवेशन बोलवावे यासाठी आमचा कायद्याने लढा सुरूच राहणार आहे.  -हंसराज वडघुले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटनाप्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शेतकºयांच्या प्रश्नांवर लढा देत आहे. गेल्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. परंतु आता शेतक-यांच्या हमीभावासह इतर मुद्द्यांवर लोकसभेत विधेयक मांडून याविषयावर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतक -यांना त्यांचे हक्क कायदेशीर मार्गाने मिळावेत यासाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीचा लढा सुरूच राहील.-अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :Farmerशेतकरी