शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवसायनातील कारखाने विक्रीसाठी हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:40 IST

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखाना मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. ३१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने या दोन्ही कारखान्यांकडील थकीत वसुली करण्यासाठी या कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखाना व नाशिक सहकारी साखर कारखाना मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सोमवारी (दि. ३१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने या दोन्ही कारखान्यांकडील थकीत वसुली करण्यासाठी या कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीच्या प्रस्तावास मंजुरी दिली. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक झाली. जवळपास दोनशे कोटीहून अधिक थकबाकी असलेल्या या दोन्ही कारखान्यांकडील वसुलीसाठी या दोन्ही कारखान्यांवर अवसायक नेमून या कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी मध्यंतरी जिल्हा बॅँकेने कार्यवाही सुरू केली होती. मात्र राज्य शासनाने साखर कारखाने विक्रीसाठी बंदी आणल्यानंतर हा विषय मागे पडला होता. नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेत भाजपा पदाधिकारी असलेले एक प्राधिकृत मंडळही नियुक्त केले होते. मात्र सिक्युराईझन अ‍ॅक्टखाली कोणत्याही परिस्थितीत या कारखान्यांच्या मालमत्तांची विक्री करून जिल्हा बॅँकेची सुमारे दोनशे पंचवीस कोटींची थकबाकी वसुली करण्यासाठी कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमुखाने हा ठराव मंजूर करण्यात येऊन कारखान्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी हिरवा कंदील दाखविला आहे.राजीनामा नाहीचसोमवारी होणाºया बैठकीत अध्यक्ष नरेंद्र दराडे हे स्वत:हून अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असे भाजपाच्या संचालकांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिला असून, नव्याने बैठकीत कशासाठी राजीनामा द्यायचा, असा पवित्रा दराडे यांनी घेतल्याने या भाजपाच्या संचालकांचा संताप झाल्याचे समजते. त्यामुळे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आता या संचालकांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.