निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचार्यांना दिलासानाशिक : लोकसभा निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या विभागीय, जिल्हा व तहसील पातळीवरील निवडणूक शाखांच्या अराजपत्रित कर्मचार्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देण्याबाबत शासनाने हिरवा कंदील दाखविला असून, त्यासाठी काही निकष ठरवून दिले आहेत. अतिकालिक भत्ता देण्याचे शासनाने जाहीर केल्याने निवडणुकीचे काम केलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.लोकसभा निवडणुकीसंबंधीचे काम ठरावीक मुदतीत पार पाडण्यासाठी मंत्रालयीन, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणूक शाखांमध्ये काम करणार्या वर्गाला सुटीच्या दिवसांसह प्रत्येक दिवशी जादा काम करावे लागले. त्याकरिता सामान्य प्रशासन विभाग, विभागीय आयुक्तांची कार्यालये तसेच सर्व जिल्हाधिकार्यांची निवडणूक कार्यालये, तहसील कार्यालये यामध्ये निवडणुकांचे काम करणार्या आणि निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये यामध्ये काम करणार्या, अराजपत्रित कर्मचारी वर्गाला तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात, इतर विभागातून/ जिल्हा आस्थापनेतून निवडणुकीच्या कामासाठी घेतलेल्या अतिरिक्त अराजपत्रित कर्मचारी वर्गाला काही शर्तींच्या अधीन राहून अतिकालिक भत्त्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कोणत्याही कामाच्या दिवशी केलेल्या जादा कामाच्या प्रत्येक पूर्ण तासाला (अर्धा तास किंवा अर्ध्या तासापेक्षा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल.) प्रत्येक तासाच्या मूळ वेतन अधिक ग्रेड पे च्या प्रमाणात देण्यास येणार आहे. तसेच दर ताशी वेतनाचा दर ठरविण्यासाठी महिना ३० दिवसांचा आणि गट ब (अराजपत्रित) व गट क कर्मचार्यांसाठी दिवस ७ तासांचा समजण्यास येईल. तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे तास बृहन्मुंबईत ८ तास व इतर ठिकाणी ९ तास समजण्यात येतील, असे हा भत्ता देण्याच्या निकषात स्पष्ट करण्यात आले आहे. आता शासनानेच निवडणुकीचे कामकाज करणार्या कर्मचार्यांना अतिकालिक भत्ता देण्याबाबत शासनाने हिरवा कंदील दिल्याने कर्मचार्यांना दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)
अतिकालिक भत्त्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील
By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST