शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन फिल्ड’मध्ये तोडगा निघेलच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:58 IST

मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड योजनेसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुरुवातील, असा विरोध असताच. परंतु योजनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तो विरोध मावळत जातो, त्यामुळे ग्रीन फिल्ड प्रकरणातही तोडगा निघेलच, असे मत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.

नाशिक : मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड योजनेसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुरुवातील, असा विरोध असताच. परंतु योजनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तो विरोध मावळत जातो, त्यामुळे ग्रीन फिल्ड प्रकरणातही तोडगा निघेलच, असे मत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले. स्काडा मीटरच्या गाजलेल्या विषयाच्या अनुषंघाने त्यांनी कोणत्याही निविदाप्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे आणि अधिकाधिक स्पर्धा झाली पाहिजे, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.स्मार्ट सिटी कंपनीची बैठक संचालकाच्या विरोधामुळे रद्द झाली. त्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर मते मांडली. मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने ग्रीन फिल्ड प्रकल्प साकारण्यात येणार असून, त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र,जैतापूर प्रकल्प त्याचप्रमाणेच राज्य सरकारने अलीकडेच सुरू केलेला समृद्धी मार्ग या प्रकल्पांनाही विरोध झाला होता. परंतु नंतर मात्र शेतकºयांनी जमिनी दिल्या होत्या. स्मार्ट सिटी कंपनीचा नक्की प्रकल्प काय आहे आणि शेतकºयांना त्याची काय लाभ होणार आहे हे कळाल्यानंतर त्याचा विरोध कमी होईल, असे कुंटे म्हणाले. जमिनीचा मोबदला रोखीत द्या, अशी काही शेतकºयांची मागणी आहे, मात्र असे करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.स्काडा मीटरच्या वादासंदर्भात त्यांनी त्यात थेट काही घडलेले नाही. कारण निविदाप्रक्रियाच राबविली गेलेली नाही. परंतु त्यात बदल केले गेले त्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यास आपण सांगितले होते, असे त्यांनी नमूद केले. कोणतीही निविदाप्रक्रिया राबवितांना त्यात पारदर्शकता असली पाहिजे, त्याचप्रमाणे स्पर्धा वाढण्याच्या हेतुनेच काम केले गेले पाहिजे, असेही कुंटे म्हणाले.वेबसाइटवर सर्व माहिती दिली पाहिजेस्मार्ट सिटीच्या कामकाजात पारदर्शकता असली पाहिजे, कोणी काही माहिती मागितली तर ती देण्यास हरकत नाही विशेषत: जे निर्णय घेतले त्याची माहिती देण्यास काहीच हरकत नाही. कंपनीच्या बैठकीचे इतिवृत्तदेखील कंपनीच्या वेबसाइटवर टाकले पाहिजे, असेही सीताराम कुंटे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी