नाशिक : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मविप्रचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट, वूमन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अस्थिरोग निदान, फिजिओथेरपी शिबिर रुग्णांच्या उत्तम प्रतिसादात पार पडले. जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित या शिबिरात कोविडविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली. शिबिरात प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा, फिजिओथेरपिस्ट डॉ. दीप्ती वाधवा देवरे, डॉ. पक्षा कांबळे, डॉ. क्षितिज कौशिक, डॉ. सूरज मेंगाणे, डॉ. दीप देवधर, डॉ. रोहित सोनजे यांनी रुग्ण तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णांच्या हाडांमधील ठिसूळपणा तपासणी तसेच विशेष करून कोविडनंतर सर्व रुग्णांना उपयुक्त फिजिओथेरपी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रेडक्रॉस सचिव मेजर पी. एम. भगत, डॉ. प्रतिभा औंधकर, चंद्रकांत गोसावी उपस्थित होते.
रेडक्रॉसच्या शिबिराला उत्तम प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST