शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सटाणेकरांना मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:01 IST

सटाणा : शहरात सापडलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली. निगेटिव्ह अहवालामुळे बागलाणवासीयांना दिलासा मिळाला आहे, मात्र बाधित रुग्णांचे अहवाल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सटाणा शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहील असेही तहसीलदार इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सटाणा : शहरात सापडलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी दिली. निगेटिव्ह अहवालामुळे बागलाणवासीयांना दिलासा मिळाला आहे, मात्र बाधित रुग्णांचे अहवाल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सटाणा शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहील असेही तहसीलदार इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  चार दिवसांपूर्वी शहरात एका पोलीस अधिकाऱ्यासह एका डॉक्टरची पत्नी कोरोनाबाधित सापडल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी ११ जणांना डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण करण्यात आले होते.प्रशासनाने त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. गुरु वारी (दि.७) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ११ जणांचा तपासणी अहवाल तहसीलदार इंगळे पाटील यांना प्राप्त झाला असून, सर्वच्या सर्व वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे बागलाणवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दरम्यान, या अकरा जणांना आता डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयातून सोडले असून, त्यांच्या घरात त्यांना विलगीकरण करण्यात आले असल्याचे वैद्यकीय सूत्रांनीसांगितले. अजूनही बाधित रु ग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासनामार्फत सुरूच असून, आतापर्यंत २८ जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आले आहे. तर अन्य काही गायब असून, त्यामध्ये एका बोगस डॉक्टरसह एका भोंदू बाबाचा समावेश आहे.---------तरीही शहर प्रतिबंधितच ......शहरात दोन जण कोरोनाबाधित सापडल्यानंतर प्रशासनाने तत्काळ तीन किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले. ११जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असला तरी जोपर्यंत दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे दोन अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या क्षेत्रात किराणा दुकान, मेडिकल, कृषी सेवा केंद्र, भाजीपाला तसेच एका गल्लीतील पाच दुकाने नियमांना बांधील राहून सुरु करण्याचा निर्णयदेखील प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे हळूहळू शहरातील व्यवहार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक