शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

व्यवसायाच्या वाढीची हाव,  झाडांवर घाव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:42 IST

शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत.

आॅन दी स्पॉटनाशिक : शहरातील झाडे ही शहराची गरज असली तरी गेल्या काही वर्षांपासून झाडे तोडण्याइतक्याच विकृत पद्धतीने झाडांवर खिळे ठोकून त्यांना जायबंदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली वृक्षे ही सावली देण्यासाठी असली तरी अनेक व्यावसायिकांच्या दृष्टीने ते जाहिरात बाजीसाठीच असल्याच्या आविर्भावात झाडांवर जाहिराती लावण्यात येतात, परंतु त्याकडे महापालिकेचे लक्ष नाही की वृक्षप्रेमींचे!सिमेंटच्या वाढत्या जंगलात हिरवळीचे महत्त्व अधिक आहे, त्याची जाण असल्यानेच शासनाने वृक्ष तोडीसंदर्भातील कायदे कडक केले आहेत. एक झाड लावायचे असेल तर त्या बदल्यात पाच झाडे लावली पाहिजे, असा कायदेशीर दंडक आहे. इतकेच नव्हे तर मध्यंतरी कुंभमेळ्याच्या नावाखाली शहरातील झाडे तोडण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा रस्त्यालगतची झाडे तोडू नये यासाठी वृक्षप्रेमी नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत. वड, पिंपळासारखी झाडे असलीच तर ती रस्त्यात असूनही तोडू नये अशाप्रकारच्या कडक सूचना दिल्या आहेत, परंतु तरीही वृक्षाच्या विरोधात असलेले नागरिकांना स्वस्थ बसवत नाही.शहरात कोणाला व्यवसाय करण्यास किंवा त्याची जाहिरात करण्यास कोणाचा नकार नाही, मात्र त्यासाठी वैध साधने उपलब्ध आहेत. अगदी पथदीपांवर जाहिराती करायच्या असतील तरीही महापालिका शुल्क आकारणी करून परवानगी देते, परंतु अशाप्रकारची परवानगी न घेता आणि शुल्क न भरताच पोस्टर किंवा लोखंडी प्लेट््स कोठेही लावल्या जातात. विशेषत: झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावल्या जात असून, त्यामुळे हजारो वृक्षांवर घाव बसत आहेत. महापालिकेच्या वतीने त्याकडे लक्ष पुरवले जात नाही. परिणामी व्यावसायिकांचे फावले आहे.वृक्षप्राधीकरण समिती नावालाच...महापालिकेच्या क्षेत्रात वृक्ष जतन करणे आणि संवर्धन करणे यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधीकरण समितीला खूप अधिकार आहेत. परंतु घोळात अडकलेली समिती सध्या कायदेशीरदृष्ट्या गठीत नाही. समितीवर जाण्यास सत्तेचे पद म्हणून अनेक जण इच्छुकअसतात. परंतु प्रत्यक्षात वृक्षांसाठी असे तळात जाऊन काम करणे अपवादानेच घडते. आयुक्त हे समितीचे अध्यक्ष असल्याने सध्या तेच सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवले तर कारवाई होऊ शकते.आकाशचिन्ह धोरण कागदावरचमहापालिकेच्या वतीने जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरण आखण्यात आले आहे. ते सरकारने अद्याप मंजूर केलेले नसले तरी नियमाधीन राहून महापालिकेला कारवाई करता येणे शक्य आहे. महापालिकेच्या जाहिरात आणि आकाशचिन्ह धोरणात तर दुकानांवर असलेल्या उत्पादनांच्या जाहिरातीच्या खाली कोठे तरी दुकानाचे नाव लिहिलेले असते त्यालादेखील मनाई आहे. परंतु त्याचेदेखील भान महापालिकेला राहिलेले नाही.माहीत असूनही कारवाई नाही...झाडांवर फलक लावणाऱ्यांच्या पोस्टरवर त्यांचे संपर्क क्रमांकदेखील असतात. विशेषत: काही व्यावसायिकांनी केवळ आपल्या व्यवसायाचे नाव आणि फोन नंबर अशाच प्रकारची जाहिरात केली असल्याने महापालिकेला संबंधितांना शोधून कारवाई करणे शक्य आहे, परंतु त्यासंदर्भातील मानसिकताच नाही ही खरी अडचण आहे.कायदा आहे, पण...झाडांवर खिळे ठोकणे हे वृक्ष विदु्रपीकरण कायद्याअंतर्गत येते. त्यानुसार संबंधित खिळे ठोकणाºयांवर कठोर कारवाईची आणि दंडाची तरतूद आहे, परंतु त्यावर महापालिका मात्र अंमल करीत नाही. वृक्षलागवडीपेक्षा वृक्षसंवर्धन महत्त्वाचे आहे, परंतु त्याहीपेक्षा अनेक वर्षे टिकतील अशाप्रकारच्या झाडांचे रक्षण व जतन करणे यासाठी अधिनियमच आहे, परंतु तरीही त्याची अंमलबजावणी केली जात नाही.हीदेखील विकृतीच...शहरात गोदाकाठी असलेली मखलाबाद शिवारातील तसेच म्हसरूळ परिसरातील झाडे तोडण्यासाठी बुंध्यांना आग लावणे किंवा झाडांची साल काढून घेणे यांसारखे प्रकार केले गेले होते. त्याच धर्तीवर झाडांना जाहिराती ठोकणे हा प्रकार आहे. एकाच झाडाला अनेक बाजूने खिळे ठोकून प्लेट लटकवल्याचे शहरात सर्वत्रच आढळते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी