शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 12:53 IST

पाटोदा - अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

पाटोदा ( गोरख घुसळे ):- अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणातील सततच्या बदलाने द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तीन ते चार पट जादा खर्चकरूनही उत्पन्न ७० ते ८० टक्कयांनी घटल्याने शेतकऱ्यांना कोट्यवधी रु पयांचा तोटा सहन करावा लागत आहे. केलेला खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. द्राक्ष हंगाम वाया गेल्याने तालुक्यातील अर्थकारणाची पूर्ण गतीच मंदावली आहे.संकटे , शेतकरी आणि शेती हे समीकरण सध्याच्या घडीला निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ हवामान धुके, दव यामुळे द्राक्षबागा रोगाच्या बळी ठरल्या आहे.अशाही परिस्थितीत शेतकºयांनी औषध फवारणी करून बागा जागविल्या मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याची थंडी व बागांवर साचणारे दविबंदू द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने सध्या काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्ष बागा खरेदीसाठीही व्यापारी धजावत नाही जरी व्यापारी खरेदी साठी आला तरी अत्यल्प दराने मागणी होत असल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली असून तो पूर्णता मेटाकुटीला आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सतत दुष्काळाशी दोन हात करणाºया येवला तालुक्यात या वर्षी वेळेवर व समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने मोठया आनंदाने उधार उसनवार तसेच कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँका तसेच सावकाराकडे गहाण ठेवून खरीप हंगामाची पेरणी तसेच द्राक्ष बागांची तयारी केली .काही दिवसात पिके चांगली आली मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर मिहन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या आनंदावर विरजण पडले हातातोंडाशी आलेली सर्व पिके खराब झाली.या अवकाळी पावसाने सप्टेंबर ,आॅक्टोबर मिहन्यात छाटणी केलेल्या संपूर्ण द्राक्ष बागा वाया गेल्या आहे .ज्या थोडयाफार बागा अवकाळीच्या तडाख्यातून वाचल्या आहे आशा बागांनाही उत्पन्नाचा मोठा फटका बसला असल्याने अवस्था बिकट झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी एकरी सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त खर्च केलेला असून एकरी सरासरी वीस टन उत्पन्न निघणे अपेक्षित होते मात्र या अवकाळी पावसामुळे फक्त पाच ते सात टन इतके अत्यल्प उत्पन्न निघत असून सरासरी बाजारभाव पंचवीस ते पन्नास रु पये दरम्यान मिळत असल्याने शेतकर्यांनी केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत असल्याने शेतकरी मोठया प्रमाणात कर्ज बाजरी झाला असून घेतलेले कर्ज व औषध दुकानदारांची देनेदारी कशी फेडायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक