शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष, कांद्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:46 IST

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण शेतकरी धास्तावले, गव्हालाही भीती

सायखेडा : दक्षिणेकडील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी पहाटेपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरणामुळे अखेरच्या टप्प्यात सुरू असलेल्या द्राक्षबागा, काढणीसाठी आलेला कांदा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत; शिवाय पाऊस पडतो की काय, या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी चार पैसे मिळतील या आशेत असताना ढगाळ वातावरणामुळे हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठ ते दहा दिवसांपासून द्राक्षांची आवक घटल्याने बाजारभावात काहीशी सुधारणा झाली आहे. बेभाव विकणारी द्राक्षे किमान ३५ ते कमाल ४० रु पये विकली जात आहेत. मात्र द्राक्ष सेटिंगच्या वेळी पाऊस पडला होता. त्यामुळे गळ आणि कुज झाल्याने उत्पादन घटले आहे. पर्यायाने बाजारपेठेत द्राक्ष आवक नसल्याने दोन रुपये जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असला तरी ढगाळ वातावरणामुळे व्यापारी भाव कमी करतात किंवा अचानक पाऊस पडला तर तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिसकावून घेतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.कांदा आणि गहू पीक ९० टक्के काढणीच्या प्रतीक्षेत असल्याने ढगाळ वातावरण आणि पावसाची भीती यामुळे पूर्ण वाया जाऊ शकते. कांदा नाशवंत असल्याने खराब हवामानातसुद्धा पिकावर परिणाम होतो. पात करपून जाते, शिवाय मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जमिनीत कांदा पोसत नाही त्यामुळे उत्पादनात घट होत असते. त्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी काही प्रमाणात शेतात कांदा काढून टाकला आहे. साठवणीचा कालावधी पुढे असल्याने शेतात पोळ घालून पसरलेला कांदा खराब होऊ शकतो. अस्मानी, सुलतानी संकटकधी सरकारी धोरण तर कधी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयाचे सातत्याने कंबरडे मोडत आहे. वाढते कर्ज, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान यांना लागणार पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.वातावरणात सतत बदल होत असल्याने शेतात कोणता शेतमाल पिकवावा आणि त्याचा सांभाळ कसा करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. द्राक्ष, कांदा, गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून घेण्याची भीती वाटत आहे.- दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरे