शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:10 IST

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देयेवला : कांदा लागवड दाट धुक्याच्या कचाट्यात

मानोरी : तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, दाट धुके पडत असून, सोमवारी ( दि.१४ ) सकाळी सात वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या तुरळक हलक्या सरी बरसल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा , लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांवर सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर, शिरसगाव, पिंपळगाव लेप , जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहेत; मात्र ही नव्याने केलेली कांदा लागवडदेखील ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णतः धास्तावला आहे. मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्ष बागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत; मात्र तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्ष फळांवर पाणी साचून काळे डाग पडत आहेत. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते; मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे उत्पादकांकडून सांगितले जात आहे.तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण असेच ढगाळ राहिल्यास द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागेल.- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी