शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 01:32 IST

संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : अस्मानी, सुलतानी संकटांची मालिका सुरूच

लखमापूर : संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील  तीन ते चार हंगामापासून द्राक्षे पिकांने बळीराजांला कोणत्याही स्वरूपाची साथ दिली नाही. जवळचे होते नव्हते ते भांडवल खर्च करूनही हातात एक नवा पैसाही मिळाला नाही. त्यात विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व इतर ठिकाणाहून घेतलेल्या कर्जाची परत फेड करायची कशी? घरगाडा  हाकायचा  कसा ? कर्ज घ्यावे तरी किती? ज्या शेतीच्या जोरावर कर्ज घेतले, तीच शेती तोट्यात आल्यानंतर ते घेतलेले कर्ज फेडावे कसे अशा नानाविध  प्रकारच्या प्रश्नांनी  द्राक्ष पंढरीतील बळीराजा हतबल झाला आहे. आता या ग्रहणातून  मुक्त होण्यासाठी शेतकरी  शेती पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. जर शेतकरी वर्गाने शेतीपद्धतीमध्ये बदल केला तर द्राक्षे पिकांवर अवलंबून असणारे व्यवसाय त्यात बेदाणा, वाइन प्रकल्प आदींवर  मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.वाइन उद्योगाला उतरती कळा चार पाच वर्षांपूर्वी वाईन उद्योगाला सुगीचे दिवस होते. परंतु सध्या द्राक्षे पिकाला लागलेली घरघर पाहता फक्त बोटावर मोजण्याइतके वाईन प्रकल्प सध्या सुरु  आहेत. वाईन ग्रेप्सचा  माल पूर्णपणे उचलला जात नाही. काही माल तसाच शिल्लक राहतो व उरलेल्या मालाचे करायचे काय? त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. यामुळे बरेच शेतकरी वाईन उद्योगाला माल देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वाईन उद्योगाला सध्या उतरती कळा लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती