शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय जोडप्यांना दोन वर्षांनंतर अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:37 IST

समाजातील जातीयता नष्ट करण्याबरोबर सर्वधर्मसमभाव जोपासला जावा यासाठी आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांच्या संसाराला

ठळक मुद्देराज्याचा निधी प्राप्त : व्हिडिओद्वारे पटविली ओळख योजनेवर सुमारे दीड कोटींहून अधिक रक्कम खर्ची पडली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया योजनेसाठी दोन वर्षांनंतर अखेर केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील ३२१ आंतरजातीय जोडप्यांना समाजकल्याण विभागाने प्रोत्साहन अनुदान अदा केले आहे. या योजनेवर सुमारे दीड कोटींहून अधिक रक्कम खर्ची पडली असून, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन व संचारबंदी असतानाही समाजकल्याण विभागाने व्हिडिओ कॉलद्वारे जोडप्यांची खात्री पटवून त्यांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा केले आहेत.

समाजातील जातीयता नष्ट करण्याबरोबर सर्वधर्मसमभाव जोपासला जावा यासाठी आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांच्या संसाराला आर्थिक हातभार लावण्यासाठी रोख रक्कम देण्याची योजना राबविली जात आहे. आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांमध्ये एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमातीतील असणे बंधनकारक असून, त्यांनी तसा प्रस्ताव समाजकल्याण खात्याकडे सुपूर्द केल्यास पुराव्यांची पडताळणी करून सुमारे ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून राबविण्यात येणाºया या योजनेसाठी सन २०१८- १९ या दोन वर्षांसाठी राज्य सरकारने त्यांच्या हिश्श्याचे एक कोटी रुपये समाजकल्याण खात्याकडे वर्ग केले. मात्र सन २०१८ मध्ये केंद्र सरकारने या योजनेसाठी स्वत:चा हिस्सा दिला नाही. त्यामुळे केंद्राच्या निधीअभावी आंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना योजनेचा लाभ देता आला नाही. यासाठी राज्य सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ३१ मार्च २०२० रोजी केंद्र सरकारने या योजनेसाठी दोन वर्षांचे एक कोटीचे अनुदानापोटी ६० लाख रुपये दिले. त्यामुळे समाजकल्याण विभागाने एक कोटी ६० लाख रुपयांच्या अनुदानातून आंंतरजातीय विवाह करणाºया जोडप्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.गेल्या दोन वर्षांपासून या योजनेसाठी सुमारे ४९५ प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून ३२१ जोडप्यांना पात्र ठरविण्यात आले. या सर्वांची खात्री पटविण्यात येऊन त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी रवींद्र परदेशी यांना दिल्याने कोरोना काळात आंतरजातीय जोडप्यांना शासनाच्या योजनेचा लाभ अदा करण्यात आला आहे. निधीअभावी अद्याप १७४ जोडपे प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद