शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

वाढत्या तक्रारींमुळे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:40 IST

नायगाव: सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यामुळे स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नायगाव: सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्यामुळे स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.सरपंच वनिता शरद कापडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत येथील स्वस्त धान्य दुकानदार गोपाळ चिंधु बर्के यांच्या विरोधात अनेक ग्रामस्थांनी तक्रारी करत परवाना रद्द करण्याची मागणी केली. गावातील ग्रामस्थांना तीनच दिवस धान्य वाटप करण्यात येते. तसेच ग्रामस्थांना शिधा पत्रिका प्रमाणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारींचा पाढा अनेकांनी वाचला. मुरलीधर बर्के यांनी धान्य दुकानात प्रत्येक महिन्यात किती साठा येतो त्याची तपासणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी करावी. येणाºया धान्य साठ्याचा तपशील दुकाना बाहेरील फलकावर लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच तीन दिवसांत सर्व ग्रामास्थांना धान्य मिळत नसल्यामुळे हा कालावधी किमान पंधरा दिवसांचा करावा अशी मागणी केली.रेशन दुकानदार बाहेरगावी राहत असल्याने नागरिकांना रेशनसाठी वाट पहावी लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावातील अनेक शिधा पत्रिका धारकांना रेशनचा लाभ मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. बंद रेशन धारकांचे रेशनकार्ड आॅनलाईन करण्यासाठी ग्राहकांकडे शंभर ते दीडशे रूपये घेतले जात असल्याची तक्रार मीराबाई मारूती सांगळे, भीमा गाजर पवार यांनी केली. २०१४ साली तयार झालेल्या शिधा पत्रिका धारकांना अजूनही धान्य मिळत नसल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. गावातील सर्व रेशन कार्ड आधार लिंक करण्याची मागणी ही अनेकांनी केली. रेशन घेणाºया ग्राहकांना आॅनलाईन पावती मिळत नसल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी अनेक विषयांबरोबर स्वस्त धान्य दुकान बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच सिन्नरच्या तहसीलदार यांच्या कडे ठराव पाठविण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच सुभाष बर्के, ग्रामसेवक व्ही. एम. लिलके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Governmentसरकार