शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

अस्थायी लोकसंख्येनुसार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:51 IST

त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांच्या समवेत गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : त्र्यंबकेश्वर येथे केसकर यांच्यासह भेट

त्र्यंबकेश्वर : नगरपालिकेला अस्थायी लोकसंख्येच्या प्रमाणात यात्रेकरू अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू, त्याचप्रमाणे येथे यात्रेकरू, पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी संपूर्ण ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याचे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांच्या समवेत गृहराज्य मंत्री दीपक केसरकर हेदेखील उपस्थित होते.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ते त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. दुपारी १.३० वाजता उभयतांचे आगमन झाले. त्र्यंबकेश्वर कोठी हॉलच्या गेटसमोर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, कैलास घुले भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, सुयोग वाडेकर, तेजस्वी ढेरगे, नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी तथा देवस्थान ट्रस्टच्या सचिव डॉ. चेतना केरु रे, बांधकाम सभापती दीपक गिते, सागर उजे, माजी गटनेते रवींद्र सोनवणे आदींनी त्यांचे स्वागत केले.अभिषेक व आरती करून मुनगंटीवार व केसकर यांनी दर्शन घेतले. वामन गायधनी व सुयोग वाडेकर यांनी पौरोहित्य केले. यावेळी देवस्थान ट्रस्टतर्फे दोन्हीही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुनगंटीवार म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी व गंगाद्वार परिसर हिरवागार करण्यासाठी स्वत: प्रयत्न करू. हे दोन्ही पर्वत आणि कुशावर्त मी दत्तक घेतले असून, वनविभागाचे अधिकारी दर आठवड्याला आढावा घेतील, असे त्यांनी सांगितले. गावाच्या समस्या व पालिकेच्या अडचणींबद्दल त्यांनी पालिकेच्या मुख्य अधिकारी डॉ. चेतना केरुरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार वनविभागाचे उपवन संरक्षक टी. बिवला, सहा. वनसंरक्षक स्वप्नील घुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे, वन परीमंडल अधिकारी सुनील झोपे, निवृत्ती कुंभार, मोहन पवार, वनरक्षक अलगट, सुनील पवार, ऋषीकेश जाधव आदी उपस्थितहोते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवसैनिकांची अनुपस्थितीत्र्यंबकेश्वर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार येणार असल्याने भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते; मात्र शिवसेनेचे मंत्री दीपक केसकर हे त्यांच्यासोबत असूनही शिवसेनेचे पदाधिकारी तर सोडाच; पण कार्यकर्तेदेखील उपस्थित नव्हते. याची उपस्थितांमध्ये चर्चा होत होती.