शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवटरावांना आमच्या घरात आजोबांचे स्थान : रामदास पाध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:35 IST

नाशिक माझ्याकडे सध्या जवळपास अडीच हजार बाहुल्या असून, त्या सगळ्या माझ्या बाहुलाघर किंवा सध्याच्या भाषेत स्टुडिओत आहेत. मात्र, शंभर वर्षांचे झालेले अर्धवटराव, आवडाबाई, ससुल्या आणि तात्या विंचू हे माझ्या घरातील स्वतंत्र खोलीत राहतात.

नाशिक माझ्याकडे सध्या जवळपास अडीच हजार बाहुल्या असून, त्या सगळ्या माझ्या बाहुलाघर किंवा सध्याच्या भाषेत स्टुडिओत आहेत. मात्र, शंभर वर्षांचे झालेले अर्धवटराव, आवडाबाई, ससुल्या आणि तात्या विंचू हे माझ्या घरातील स्वतंत्र खोलीत राहतात. अर्धवटरावांना तर आमच्या घरात आजोबांसारखे स्थान आणि मान असल्याचे सांगत शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी निर्मितीपासून आतापर्यंत शंभरी पार केलेल्या बाहुल्यांबद्दलचे विशेष स्थान अधोरेखित केले.चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मुक्तसंध्या या कार्यक्रमात रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये यांची मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी घेतली. यावेळी बोलताना पाध्ये यांनी वडिलांनी निर्मिती केलेल्या अर्धवटरावांचा जीवनप्रवास आणि त्यांचा कलाप्रवास उलगडत नेला. अर्धवटराव हा बाहुला मिकी-माउसपेक्षाही १० वर्षे जुना असल्याने त्याला सर्वच स्तरावर विशेष स्थान असल्याचेही पाध्ये यांनी नमूद केले. मी वयाच्या आठव्या वर्षापासून वडिलांकडून आणिअन्य कलाकारांकडून बाहुल्यांची कला शिकत होतो. त्याबरोबरच इंजिनिअरिंगचे शिक्षणदेखील घेतले. नोकरीनिमित्त मी अमेरिकेत गेलो असतानाच तेथील शब्दभ्रमकार एडगर बर्गन हे त्याच्या  चार्ली मॅकार्थी या बाहुल्यासह स्वत:च्या स्वतंत्र विमानाने  आल्याचे पाहिल्यावर मी स्वत: नोकरीचा राजीनामा देऊन  भारताचा शब्दभ्रमकार होण्याचा निर्णय घेतल्याचे पाध्ये यांनी नमूद केले.कार्यक्रमात पाध्ये यांच्या जीवनावरील गप्पा, अपर्णा पाध्ये यांचा पपेटरीतील सहभाग यावरदेखील दिलखुलास गप्पा रंगल्या. कार्यक्रमाच्या अखेरीस काही मिनिटे अर्धवटरावांसमवेत पाध्ये यांनी त्यांच्या अर्धवटरावांसह शो सादर करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी अर्धवटराव यांचे शंभरी पूर्ण केल्याबद्दल नाशिकच्या सुवासिनींकडून औक्षणदेखील करण्यात आले.तिकडे माझ्यासारखेच खूप बोलके बाहुलेअर्धवटराव सध्या तुम्हाला बरीच मागणी दिसते. नाही सध्या थोडीशी कमी झाली आहे. का ? का ? अहो तिकडे राजकारणात पण माझ्यासारखे बोलके बाहुले सध्या खूप झालेत आणि मुख्य म्हणजे त्यातील बरेचसे माझ्यासारखे अर्धवटराव आहेत, असा राजकारणाच्या सद्यस्थितीवरील पंच पाध्ये यांनी अर्धवटरावांच्या मुखातून वदवताच प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद देण्यात आली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक